शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

पाकिस्तानच्या भावी पंतप्रधानांना नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 11:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना फोन करून विजयाच्या शुभेच्छा दिल्यात.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना फोन करून विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. इम्रान खानचा पक्ष तेहरीक-ए-इन्साफ(पीटीआय)ला निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तानमधली लोकशाही आणखी मजबूत होईल, अशी आशा फोनवरून नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.  14 आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा नक्की शपथविधी होईल, असा विश्वास ‘पीटीआय’ पक्षाने व्यक्त केला.आम्हाला बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नक्की मिळेल व स्वातंत्र्यदिनाच्या आधी देशाला नवे सरकार मिळेल, असे ‘पीटीआय’चे प्रवक्ते नईनूल हक यांनी ठामपणे जाहीर केले. मात्र नेमका कोणाकडून पाठिंबा अपेक्षित आहे व हे पाठिंबा देणारे सरकारमध्ये सामिल होणार की बाहेरून पाठिंबा देणार, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. दोन-चार दिवसांत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे ते म्हणाले. इकडे इम्रान खान यांच्या बाजूने सरकार स्थापनेची तयारी सुरु असताना अनुक्रमे 64 व 43 जागा मिळून दारुण पराभव झालेले नवाज शरीफ यांची मुस्लिम लीग व आसिफ अली झरदारी यांचा ‘पीपीपी’ पक्ष विरोधी पक्ष म्हणून नेमकी कोणती भूमिका घ्यायची या संभ्रमात आहे. निवडणुकीत ‘रिगिंग’ झाल्याचा आरोप करून 12 पक्षांनी फेरनिवडणुकीची मागणी केली. त्या संयुक्त बैठकीला हे दोन पक्ष हजर होते. परंतु त्यातील काही पक्षांनी सदस्यत्वाची शपथ न घेता संसदेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. परंतु या टोकापर्यंत जायचे की नाही हे मुस्लिम लीग व पीपीपीचे अद्याप ठरलेले नाही.बहुमतासाठी 16 जागा कमी270 जागांपैकी ‘पीटीआय’ पक्षाला 116 जागा मिळाल्या. बहुमतासाठी 16 जागा कमी आहेत. पक्षाला बहुमताची जुळणी करताना याहून अधिक जागांचे गणित करावे लागणार आहे. याचे कारण असे की, स्वत: इम्रान खान पाच मतदारसंघांतून व इतर काही उमेदवार एकाहून अधिक ठिकाणहून निवडून आले आहेत. शपथ घेण्यापूर्वी त्यांना एक सोडून बाकीच्या जागांचा राजीनामा द्यावा लागेल.

कराचीमध्ये सापडल्या रिकाम्या मतपेट्याकराची आणि सियालकोट शहरात रस्त्याच्या कडेला पाच रिकाम्या मतपेट्या आणि डझनपेक्षा जास्त मतपत्रिका सापडल्यामुळे निवडणूक खुल्या आणि न्याय वातावरणात झाल्याच्या निवडणूक आयोगाच्या दाव्याबद्दल संशय व्यक्त होत आहे. युरोपियन युनियनच्या तुकडीने 25 जुलै रोजी झालेल्या या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून काम पूर्ण केले, परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध व उमेदवारांना प्रचारासाठी न मिळालेल्या समान संधीने ही निवडणूक ओळखली जाईल.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी