शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी सरकारनं लॉन्च केली 'भूमी बँक', आता गुंतवणूकदारांना घरबसल्या मिळणार 'हे' मोठे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 16:27 IST

भूमि बँक सिस्टिमला आतापर्यंत केवळ सहा राज्येच जोडली गेली आहेत. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या सिस्टिमशी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश जोडले जातील, अशी सरकारला आशा आहे.

नवी दिल्ला - केंद्रातील मोदी सरकारने आता एका विशेष बँकेची सुरुवात केली आहे. यामुळे उद्योगाच्या दृष्टीने विविध राज्यांतील जमिनीची उपलब्धता आणि तिच्याशी संबंधित इतर माहितीही डिजिटल माध्यमाने सहजपणे मिळू शकणार आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिमने (जीआयएस) सुसज्ज राष्ट्रीय 'भूमी बँकेची' सुरुवात करताना केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, की याच्या माध्यमाने गुंतवणूकदार उद्योगासाठीची जमीन आणि संसाधनांच्या उपलब्धतेची माहिती मिळवू शकतील.

भूमि बँक सिस्टिमला आतापर्यंत केवळ सहा राज्येच जोडली गेली आहेत. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या सिस्टिमशी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश जोडले जातील, अशी सरकारला आशा आहे. ही बँक सध्या सुरुवातीच्याच टप्प्यावर आहे. यानंतर जमिनीची ओळख आणि खरेदी प्रक्रिया अधिक सक्षम आणि पारदर्शक बनवली जाईल. यासाठी राज्यांनाही आपल्या भागातील जमिनीसंदर्भात माहिती द्यावी लागेल. वाणिज्य तथा उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘‘या प्रणालीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 3,300 पेक्षा अधिक औद्योगिक पार्कचा समावेश करण्यात आला आहे. यात  तब्बल 4,75,000 हेक्टर जमिनीचा समावेश होतो. मिळालेल्या माहितीनुसार, यात वने, सिंचन क्षेत्र, कच्च्या मालाचा हीट मॅप, तसेच संपर्काच्या विविध पायऱ्यांचा समावेश आहे.’’ 

पीयूष गोयल म्हणाले, ज्या देशांत भारतीय कंपन्यांना बंधनांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी काही म्युच्यूअल गोष्टीही लागू केल्या जाऊ शकतात. या शिवाय, देशात व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी संबंधित सर्व आवश्यक परवानग्या घेण्यासाठी त्यांनी सिंगल विंडो प्रणाली तयार करण्यावरही जोर दिला. तसेच, ‘‘यामुळे गुंतवणूकदारांना माहिती मिळवणे आणि विविध ठिकानांवरून मंजुरी घेण्यासाठी अनेक प्लॅटफार्म अथवा कार्यालयांत जाण्याची आवश्यकतादेखील जवळपास संपुष्टात येईल. या प्रणालीच्या माध्यमाने गुंतवणूकदारांना वेळच्या वेळी माहिती मुळू शकते,’’ असेही गोयल म्हणाले, ही बँकिंग प्रणाली औद्योगिक माहिती प्रणाली (आयआयएस) आणि राज्यांची भौगोलिक सूचना प्रणालीचे (जीआयएस) एकत्रीकरण करून तयार करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारpiyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँक