Narendra Modi Interview: काँग्रेस देशाच्या मुख्य प्रवाहात राहिली तर...; पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 08:12 PM2022-02-09T20:12:51+5:302022-02-09T20:13:19+5:30

जय-पराजय आम्ही दोन्ही पाहिलेत. आम्ही जेव्हा विजयी होतो तेव्हा जास्तीत जास्त जमिनीशी नाळ तुटू न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं मोदींनी सांगितले.

Narendra Modi Interview: PM Modi has said that if Congress stays in the mainstream of the country, then what a loss to the country | Narendra Modi Interview: काँग्रेस देशाच्या मुख्य प्रवाहात राहिली तर...; पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टच बोलले

Narendra Modi Interview: काँग्रेस देशाच्या मुख्य प्रवाहात राहिली तर...; पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टच बोलले

Next

नवी दिल्ली – जातीयवाद, भाषिकवाद, प्रांतवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे काँग्रेसच्या कार्यशैलीचा आणि विचारसरणीचा आधार आहे. हे या देशाच्या मुख्य प्रवाहात राहिले तर देशाचे किती मोठे नुकसान आहे. देशाची आज जी अवस्था झाली त्याला सर्वात जास्त जबाबदार काँग्रेस आहे. या देशात जितके पंतप्रधान होते, मी, अटल बिहारी वाजपेयी सोडून सर्व काँग्रेसच्या शाळेतीलच आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने अनेक पराभव पाहिले. त्यातून विजय मिळवला. आम्ही जय-पराजय पाहिले, डिपॉझिट जप्त होतानाही पाहिले. एकेवेळी भाजपा नव्हता. मी राजकारणात नव्हतो. त्यावेळी जनसंघ होता. अनेक ठिकाणी मिठाई वाटप सुरु होते. निवडणुकीत हरल्यानंतरही मिठाई का वाटत होते असा आम्हाला प्रश्न पडला. तेव्हा कळालं की आमच्या ३ लोकांचे डिपॉझिट वाचलं म्हणून मिठाई वाटतायेत आम्ही ते दिवस पाहिलेत असं त्यांनी सांगितले.  

त्यामुळे जय-पराजय आम्ही दोन्ही पाहिलेत. आम्ही जेव्हा विजयी होतो तेव्हा जास्तीत जास्त जमिनीशी नाळ तुटू न देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही निवडणूक जिंकलो तरी लोकांची मनं जिंकण्यात कुठेही कमी पडत नाही. आम्ही प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षण, योजना, काम जनतेचं मन जिंकण्याचं काम करतो. ज्या गोष्टीतून लोकांना समाधान मिळतं आम्ही तेच करतो असंही मोदींनी सांगितले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नेहरुंच्या विधानावर मोदींचे स्पष्टीकरण

मी कुणाच्या आईवडिलांना, आजी-आजोबांना काही बोललो नाही. मी देशाच्या पंतप्रधानांनी काय म्हटलं ते सांगितले. मी म्हटलं होतं की, एका पंतप्रधानांचे विचार काय होते तेव्हा काय स्थिती होती. आणि आज पंतप्रधानांचे विचार काय आहेत आणि स्थिती काय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत पंडित जवाहरलाल नेहरुंवरील चर्चेवर स्पष्टीकरण दिले.

आम्हाला ५ राज्यांत सेवा करण्याची संधी मिळेल

मी या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व राज्यांना पाहतोय. भाजपाची लाट आहे. प्रचंड बहुमताने भाजपा जिंकेल. या ५ राज्यातील जनता भाजपाला सेवा करण्याची संधी देईल. ज्या राज्यांत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेने आम्हाला ओळखलं आहे. आमच्या कामाला पाहिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनासाठी आप, काँग्रेस जबाबदार

कोविड महामारीत सर्व म्हणत होते जिथे आहात तिथेच राहा. काँग्रेसनं लोकांना फ्री तिकीट देऊन प्रवास करण्यास प्रोत्साहन दिले. दिल्लीत आम आदमी पक्षानेही व्हॅनमध्ये भरभरुन झोपड्यांमधील लोकांना सांगितले तुम्ही लवकर जा, इथं लॉकडाऊन होणार आहे असं सांगत कोरोनासाठी आप, काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.  

Web Title: Narendra Modi Interview: PM Modi has said that if Congress stays in the mainstream of the country, then what a loss to the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.