संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जबरदस्त सभा सुरू आहेत. ते आपल्या सभेत 'गॅरंटी' हा शब्द सातत्याने वापरत आहेत. यातच, गुजरातचे माजी विरोधी पक्षनेते अर्जुन मोधवाडिया यांनी मोदींचे तोंड भरून कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी जो शब्द देतात तो नक्की पाळतात, असे मोधवाडिया यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी त्यांचा एक जुना अनुभवही शेअर केला. आपण एकदा काही कामासाठी पंतप्रधान मोदींना मेसेज केला होता आणि त्याच मेसेजवर त्यांनी आपले काम करून दिले, असे मोधवाडिया यांनी सागितले.
जुन्या गोष्टी विसरत नाहीत PM मोदी - आता भाजपमध्ये सामील झालेले अर्जुन मोधवाडिया म्हणाले, पंतप्रधान मोदी जुन्या गोष्टी कधीच विसरत नाहीत. त्यांनी केवळ माझ्या एका मेसेजवर माझे काम करून दिले होते. पंतप्रधान मोदी हे मोठ्या मनाचे नेते आहेत. ते त्यांच्या पक्षातील नेत्यांबरोबर विरोधकांचेही व्यवस्थित ऐकतात. एका मुलाखतीत अर्जुन मोधवाडिया म्हणाले, मी गुजरातचा विरोधी पक्षनेता असताना, पक्षाच्या वतीने भूमिका मांडत असे. तेव्हा माझी जी भूमिका असायचा, तिला बहुतेक वेळा स्थान देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत होते. तेव्हा ते म्हणायचे की, आपण विरोधी पक्षाच्या बाजूने बोलताना आमचे सरकार तुमचे म्हणणे नोट करते आणि जे आमलात आणण्यासारखे असेल ते आमलातही आणते.
एयरपोर्टचा रनवे वाढविण्याची केली होती मागणी - एका जुना किस्सा सांगताना मोधवाडिया म्हणाले, पोरबंदर विमानतळावरील टर्मिनलमध्ये एका नव्या इमारचीचे उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आले होते. नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मी आमदार तथा विरोधी पक्षनेता म्हणून कार्यक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा मी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मागणी केली होती की, आमच्या विमानतळाची धावपट्टी 1300 मीटर आहे, यामुळे मोठी विमाने येथे उतरू शकत नाहीत. ही धावपट्टी 2,600 मीटर करण्यात यावी. यावर पटेल म्हणाले होते, नरेंद्र मोदी यांनी आम्हाला जमीन दिली, तर आम्ही करू. त्याचवेळी आम्ही आपल्याला धावपट्टीसाठी जमीन देऊ, असे नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमोर सांगितले होते.पीएम बनने पर याद दिलाया वादा -मोधवाडिया पुढे म्हणाले, त्यांनी (नरेंद्र मोदी) तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली. मात्र, 2012 नंतर मी आमदार नव्हतो. त्यानंतर नरेंद्र मोदीही पंतप्रधान झाले. यानंतर हा विषय बाजूला पडला. जमीन इतरत्र देण्यात आली. त्यानंतर मी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांना फोन केला. त्यांना नरेंद्र मोदींच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. यानंतर, विजय रुपानी यांनी पीएम मोदींना फोन केला आणि सांगितले की अर्जुन मोधवाडिया यांनी आपल्याला मैसेज दिला आहे की, आपण सर्वांसमोर अर्जुन मोधवाडिया पुढे म्हणाले की, त्यांनी (नरेंद्र मोदी) तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. पण, २०१२ नंतर मी आमदार नव्हतो. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. यानंतर ते बाजूला करण्यात आले. जमीन इतरत्र देण्यात आली. त्यानंतर मी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपानी यांना फोन केला. त्यांना नरेंद्र मोदींच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. यानंतर विजय रुपानी यांनी पीएम मोदींना फोन केला आणि सांगितले की, अर्जुन मोधवाडिया यांनी आपल्यासाठी मेसेज दिला आहे की, आपण सर्वांसमोर पोरबंदरमध्ये धावपट्टी विस्तारासंदर्भात आश्वासन दिले होते.
यानंतर, पंतप्रधान मोदींनी तातडीने धावपट्टीचा विस्तार करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी केवळ एका मेसेजवर माझे काम केले. यावरून पंतप्रधान मोदी किती मोठ्या मनाचे आहेत हे सिद्ध होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.