Narendra Modi Jammu Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी त्यांच्या रॅलीच्या ठिकाणापासून 12 किमी अंतरावर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांचा तपास सुरूपोलिसांनी सांगितले की, जम्मूमधील बिश्नाह येथील लालियान गावात गावकऱ्यांनी खुल्या शेतजमिनीत एका संशयास्पद स्फोटाची माहिती दिली. यानंतर सांबाच्या पल्ली गावातील कार्यक्रमस्थळी याची माहिती देऊन सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली. याच ठिकाणी पंतप्रधान मोदी देशभरातील पंचायतींना संबोधित करणार आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू दौरा आहे.
20,000 कोटींच्या योजनांची पायाभरणी करणारराष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरला भेट देणार असून देशभरातील ग्रामसभांना संबोधित करणार आहेत. ते आज 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान जम्मू दौऱ्यादरम्यान अमृत सरोवर नावाच्या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करतील. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 जलस्रोतांचा विकास आणि पुनरुज्जीवन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
या योजनाही सुरू करणार आहेतकेंद्रशासित प्रदेशातील दोन प्रदेशांमध्ये सर्व-हवामान कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यासाठी बनिहाल-काझीगुंड रोड बोगद्याचा समावेश आहे. 8.45 किमी लांबीच्या बोगद्यामुळे बनिहाल आणि काझीगुंड दरम्यानचे अंतर 16 किमी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे दीड तास कमी होईल. 7,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेच्या तीन रस्त्यांच्या पॅकेजची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.