Narendra Modi Loksabha Speech: तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही; पंतप्रधानांनी घेतली काँग्रेसची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 06:53 PM2022-02-07T18:53:49+5:302022-02-07T18:55:42+5:30
इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही, मोदींचा काँग्रेसवर निशाणा.
लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांनी संसदर सदस्यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले विचार मांडल्याबाबत आभारही व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेस एक क्षणही मोदींशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला.
"तुम्ही फाईल्समध्ये अडकून राहिलात, पण आम्ही लोकांचं जीवन बनवलं. सध्या देशात पायाभूत सुविधांची कामंही वेगानं सुरू आहेत. यामुळे देशात रोजगार निर्माण होत आहे. तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही. जे इतिहासातून काही बोध घेत नाहीत, ते इतिहासातच हरवून जातात," असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा शाधला.
अंहकार बदलला नाही
"इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही. इतकी वर्षे देशावर राज्य करणारे आणि मोठ्या महालात राहणारे छोट्या शेतकऱ्यांबाबत बोलणं विसरुन गेले. भारताच्या प्रगतीसाठी छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. छोटा शेतकरीही भारताची प्रगती अजून मजबूत करेल," असं मोदी यावेळी म्हणाले.
#WATCH PM Modi targets Congress in Parliament says, no change in your ego even after being voted out from many states years ago pic.twitter.com/19MKblziYi
— ANI (@ANI) February 7, 2022
यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता 'मेक इन इंडिया'चा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. मेक इन इंडियाची खिल्ली उडवली गेली. परंतु याची खिल्ली उडवणाऱ्यांचीच लोकांनी मजा केली. जर तुमचे पाय जमिनीवर असते तर तुम्हाला गरीबांच्या समस्या दिसल्या असत्या. परंतु महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला पाहायचं नाही. तुम्ही योगाची खिल्ली उडवली आणि विरोध केला, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.