लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. यावेळी त्यांनी संसदर सदस्यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले विचार मांडल्याबाबत आभारही व्यक्त केले. दरम्यान, काँग्रेस एक क्षणही मोदींशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला."तुम्ही फाईल्समध्ये अडकून राहिलात, पण आम्ही लोकांचं जीवन बनवलं. सध्या देशात पायाभूत सुविधांची कामंही वेगानं सुरू आहेत. यामुळे देशात रोजगार निर्माण होत आहे. तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही. जे इतिहासातून काही बोध घेत नाहीत, ते इतिहासातच हरवून जातात," असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा शाधला.
अंहकार बदलला नाही"इतक्या वर्षांपर्यंत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अहंकारात बदल झाला नाही. इतकी वर्षे देशावर राज्य करणारे आणि मोठ्या महालात राहणारे छोट्या शेतकऱ्यांबाबत बोलणं विसरुन गेले. भारताच्या प्रगतीसाठी छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. छोटा शेतकरीही भारताची प्रगती अजून मजबूत करेल," असं मोदी यावेळी म्हणाले.