शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 1:47 PM

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात डिजिटल अटकेपासून बचावाची माहिती दिली.

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि. 27) 115 व्या 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या डिजिटल अरेस्टच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि लोकांना जागरुक केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये पोलिसांचे कपडे घातलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने चौकशी करत आहे आणि त्याला आधार कार्ड दाखवण्याची मागणी करतोय.

डिजिटल अरेस्टवर पीएम मोदींनी केले जागरुकडिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील लोक डिजिटल अटकेचे बळी ठरत आहेत. भीतीपोटी अनेकजण आपल्या कष्टाने कमावलेले पैसे या ऑनलाईन गुन्हेगारांना देत आहेत. लोकांना जागरुक करत पीएम मोदी म्हणाले की, तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तपास यंत्रणा कधीही अशाप्रकारचे फोन किंवा व्हिडिओ करत नाहीत. तमाम भारतीयांना अशा घोटाळ्यापासून सावध राहावे.

डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पेकायद्यात डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही, ही फसवणूक, खोटेपणा आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी सर्व तपास यंत्रणा राज्य सरकारांसोबत एकत्र काम करत आहेत. पीएम मोदींनी यावेळी डिजिटल अटकेपासून बचावाचे तीन टप्पे सांगितले. 

  1. थांबा/शांत राहा
  2. विचार करा
  3. योग्य कारवाई करा

 

पंतप्रधान म्हणाले की, असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा, घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा. दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही. तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून घ्या की काहीतरी चुकीचे आहे. शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, तिसरा टप्पा म्हणजे योग्य कारवाई. अशाप्रकारचे फोन आल्यावर नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा. तसेच सायबर क्राईम वेबसाइटवर अहवाल द्या. कुटुंब आणि पोलिसांना कळवा.

अशी केली जाते डिजिटल अरेस्टडिजिटल अटक घोटाळ्याची सुरुवात एका अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलने होते. हा ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल असू शकतो. पीडितेला अज्ञात क्रमांकावरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांना बनावट पार्सल, मोबाईल क्रमांक बंद करणे किंवा बनावट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची माहिती दिली जाते. यानंतर, त्यांना बनावट अटक किंवा बनावट वॉरंट दाखवले जाते. यानंतर त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशाप्रकारे हजारो, लाखो रुपये उकळले जातात.

तक्रार कशी करायची?पीएम म्हणाले की, अशी फसवणूक करणारे हजारो व्हिडिओ आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. लाखो सिमकार्ड आणि बँक खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत. एजन्सी त्यांचे काम करत आहेत, परंतु डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारे घोटाळे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, तुमच्यासोबत झालेला घोटाळा #SAFEDIGITALINDIA हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जागरूक करा. डिजिटल अटक घोटाळा किंवा इतर सायबर फसवणुकीबद्दलच्या तक्रारी नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (cybercrime.gov.in/) किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून नोंदवल्या जाऊ शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcyber crimeसायबर क्राइम