Mamata Banerjee : "काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा इतकी शक्तीशाली होऊ शकली" 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:01 PM2021-10-30T16:01:53+5:302021-10-30T16:14:18+5:30

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे.

narendra modi more powerful due to congress mamata banerjee reached goa | Mamata Banerjee : "काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा इतकी शक्तीशाली होऊ शकली" 

Mamata Banerjee : "काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा इतकी शक्तीशाली होऊ शकली" 

Next

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसमुळे मोदीजी शक्तीशाली" असं म्हणत निशाणा साधला आहे. ममता यांनी "काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (BJP) इतकी शक्तीशाली होऊ शकली तसेच काँग्रेसच भाजपासाठी प्रचारक म्हणून काम करत आहे" असं म्हटलं आहे. ममता बॅनर्जी सध्या गोवा दौऱ्यावर असून गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी प्रचाराला सुरुवात केली आहे. 

विजय सरदेसाई यांचा पक्ष 'गोवा फॉरवर्ड पक्षा'सोबत (Goa Forward Party) ममता बॅनर्जी यांनी युतीची घोषणीही केली आहे. सरदेसाई आतापर्यंत भाजप सरकारसोबत राहिलेत. काँग्रेससोबत कोणत्याही निवडणुकीत हातमिळवणी करण्याची शक्यता यावेळी ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावली. काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची गरज लक्षात घेण्यात अपयशी ठरलंय असं म्हणतानाच भाजपचा सामना करण्यासाठी सर्व स्थानिक पक्षांना एकत्रित येण्याची गरज त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. 

"काँग्रेस भाजपासाठी टेलिव्हिजन रेटिंग्ज पक्ष बनलाय"

देशाच्या संविधानाचा पाया मजबूत करण्यासाठी हे गरजेचं असल्याचं देखील ममता यांनी  म्हटलं आहे. "मोदीजी दिवसेंदिवस शक्तीशाली होत चालले आहेत आणि याचं कारण काँग्रेस आहे. काँग्रेस भाजपासाठी टेलिव्हिजन रेटिंग्ज पक्ष बनलाय. जर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तर त्याचा फटका देशाला बसेल. परंतु, देशानं हे सहन का करावं? देशाकडे पुरेशा संधी आणि पर्याय आहेत" असंही यावेळी ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

विजय सरदेसाई यांनी तृणमूलशी केली हातमिळवणी 

बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचा नामोनिशाण उरणार नाही केवळ महाआघाडी राहील, असं काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं, असं सांगत ममतांनी 'तो' अंदाज चुकीचा ठरल्याचं म्हणत काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना एकही जागा मिळू शकली नाही. आता गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आघाडी करण्यास काँग्रेसने नकार दिला. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी तृणमूलशी हातमिळवणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: narendra modi more powerful due to congress mamata banerjee reached goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.