मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यानंतर ते, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान पदाची हॅट्ट्रिक करणारे दुसरे पंतप्रधान ठरतील. यातच, भाजपच्या 20 बड्या नेत्यांची नावेही समोर आली आहेत, ज्यांना मोदी सरकार 2.0 मध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांची नावे यादीत दिसत नाहीत. या नेत्यांना आतापर्यंत ना फोन आला आहे, ना हे नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. खरे तर, यात असेही काही नेते आहेत ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.
अशी आहे या २० बड्या नेत्यांची यादी -- स्मृति ईरानी - नारायण राणे - मीनाक्षी लेखी- अनुराग ठाकुर - रावसाहेब दानवे - जनरल वीके सिंह - अर्जुन मुंडा- साध्वी निरंजन ज्योति- आरके सिंह - राजीव चंद्रशेखर- कपिल पाटिल - अजय मिश्रा टेनी- सुभाष सरकार - जॉन बारला- भारती पंवार- अश्विनी चौबे - निशीथ प्रमाणिक- अजय भट्ट - राजकुमार रंजन सिंह- भगवत कराड
पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले हे 22 खासदार -शपथविधीपूर्वी पंतप्रधानांच्या निवास्थानी पोहोचलेल्यांमध्ये, सर्बानंद सोनोवाल, चिराग पासवान, अन्नपूर्णा देवी, मनोहर लाल खट्टर, शिवराज सिंह चौहान, भागीरथ चौधरी, किरेन रिजिजू, जितिन प्रसाद, एचडी कुमारस्वामी, ज्योतिरादित्य सिंधिया, निर्मला सीतारमण, रवनीत बिट्टू, अजय टमटा, राव इंद्रजीत सिंह, नित्यानंद राय, जीतन राम मांझी, धर्मेंद्र प्रधान, गजेंद्र सिंह शेखावत, हर्ष मल्होत्रा, एस जयशंकर, सीआर पाटिल आणि कृष्णपाल गुर्जर या २२ जणांचा समावेश होता.