शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अनुभवी नेत्यांवर विश्वास; नव्या चेहऱ्यांनाही संधी, आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 7:44 AM

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक चेहरे हे जुन्या मंत्रिमंडळातील असून त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे दिसते. जातीय व राजकीय समीकरण जुळविण्यासाठी ३३ नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली.  

- संजय शर्मानवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक चेहरे हे जुन्या मंत्रिमंडळातील असून त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याचे दिसते. जातीय व राजकीय समीकरण जुळविण्यासाठी ३३ नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली.  तेलुगू देसम पार्टी, जदयु, शिंदेसेना, लोकजनशक्ती पार्टीच्या नेत्यांचा त्यासाठीच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळालेले राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, एस. जयशंकर, निर्मला सीतारमण, हरदीपसिंह पुरी, मनसुख मांडविया, एस. पी. सिंह बघेल, बी. एल. वर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया, वीरेंद्र कुमार खटीक, जी. किशन रेड्डी, किरेन रिजिजू, जितेंद्र सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, अर्जुनराम मेघवाल हे मागील वेळीही मंत्री होते. 

शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीत आणत केंद्रीय मंत्री करण्यात आले. मोदी यांच्यानंतर शिवराज यांच्या शपथविधीवेळी सर्वाधिक टाळ्या वाजल्या. पंजाबमध्ये शिखांची नाराजी दूर करण्यासाठी पराभूत झालेल्या रवनीत बिट्टू यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला.  शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह एनडीएतील घटकपक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार-आमदार, उद्योगपती उपस्थित होते.

कोणत्या राज्यातून किती मंत्री? उत्तर प्रदेश १०, बिहार ८, महाराष्ट्र ६, गुजरात ५, कर्नाटक ५, मध्य प्रदेश ५, राजस्थान ४, आंध्र प्रदेश ३, ओडिशा ३, हरयाणा ३, झारखंड २, पश्चिम बंगाल २, तेलंगणा २, केरळ २, पंजाब १, गोवा १, दिल्ली १, तामिळनाडू १, छत्तीसगड १,  जम्मू-काश्मीर १, अरुणाचल १, आसाम १, हिमाचल  १, उत्तराखंड १

शेजारील देशांच्या नेत्यांची उपस्थितीमालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे विदेशातील मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. 

अनेक दिग्गजांचा पत्ता कट मोदी सरकार ३.०मधून अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यात प्रामुख्याने स्मृती इराणी, नारायण राणे, अर्जुन मुंडा, अनुराग ठाकूर, डॉ. भागवत कराड, जनरल व्ही. के. सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही.

महाराष्ट्र व हरयाणावर लक्ष चार महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या महाराष्ट्र व हरयाणाला मंत्रिमंडळात विशेष स्थान देण्यात आले. महाराष्ट्रातील सहा व हरयाणातील तिघांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे महायुतीला विधानसभेत किती फायदा होईल, हे येणारा काळच सांगेल. त्याशिवाय हरयाणातही त्याचा कितपत फायदा होईल, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. 

असे आहे मंत्रिमंडळपंतप्रधान : नरेंद्र मोदीकॅबिनेट मंत्री : राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमण, एस. जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एच.डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओराम, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ. मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर. पाटील.राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : राव इंद्रजीत सिंह, प्रतापराव जाधव, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, जयंत चौधरी. राज्यमंत्री : जितिन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमन्ना, चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बनवारीलाल वर्मा, शंतनू ठाकुर, सुरेश गोपी, एल. मुरुगन, अजय टम्टा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रवनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा खडसे, सुकांता मजूमदार, सावित्री ठाकूर, तोखन साहू, डॉ. राजभूषण निषाद, श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पबित्रा मार्गेरिटा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी