नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून सायंकाळी ७.१५ वाजता शपथ घेण्याचा मुहूर्त काढला. त्याची काही कारणे आहेत. हा मुहूर्त खूप खास आहे, याला विजय मुहूर्त म्हणतात, ज्याचा थेट संबंध सूर्याशी आहे. विशेष म्हणजे ज्या टीमने अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभमुहूर्त ठरवला त्याच टीमने पंतप्रधानांच्या शपथ घेण्याचा हा मुहूर्त ठरवला आहे.
या शुभमुहूर्तावर मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यास त्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्यांनी केलेले प्रत्येक काम यशस्वी होईल, असे ते म्हणतात. आधी शनिवारी पंतप्रधान मोदी शपथ घेतील, असे बोलले जात होते; पण नंतर कार्यक्रम अचानक बदलला आणि त्यानंतर रविवारी शपथविधीचा दिवस निश्चित करण्यात आला. या मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते तसेच या काळात केलेल्या प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळते, असे मानले जाते.
विजय मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी...ज्योतिष तज्ज्ञांनुसार रविपुष्याचा योगायोग आहे, विजय मुहूर्तावर केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते तसेच या काळात केलेल्या प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळते, असे मानले जाते. याशिवाय रविवारी पुनर्वसू नक्षत्र आहे, या नक्षत्रात भगवान रामाचा जन्म झाला आहे आणि वृश्चिक लग्नही आहे. विशेष म्हणजे २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींनी याच कालावधीत शपथ घेतली होती.
सात देशांचे नेते उपस्थितमोदींच्या शपथविधी सोहळ्याला सात शेजारी देशांचे नेते उपस्थित होते. त्यात बांगलादेशच्या अध्यक्षा शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा समावेश होता. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त सर्व नेते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित राहतील.