PM Modi Oath Taking Ceremony : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सलग तिसरा विजय मिळाला आहे. यानंतर, नरेंद्र मोदीही रविवारी (९ जून २०२४) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी समारंभातच, काही खासदारही मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. सध्या मोदी ३.० च्या मंत्रिमंडळासाठी अनेक नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. अनेक नावांवर चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळात सहकारी पक्षांनाही पूर्ण न्याय दिला आहे. मात्र, महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे.
जदयूला मंत्रीमंडळात स्थान, होऊ शकतात २ मंत्री -महत्वाचे म्हणजे, एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीएतील एक महत्वाचा पक्ष असलेल्या जनता दल यूनाइटेडलाही मोदी मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळू शकते. जदयूच्या दोन खासदारांना मंत्री केले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. यात, लोकसभा खासदार ललन सिंह आणि राज्यसभा खासदार राम नाथ ठाकूर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे.
या नावांची सुरू आहे चर्चा! -नाम - पक्षपीयूष गोयल - बीजेपी महाराष्ट्रनारायण राणे - बीजेपी महाराष्ट्रनितिन गडकरी - बीजेपी महाराष्ट्रसंदीपान भूमरे - शिवसेना शिंदे गुटप्रताप राव जाधव- शिवसेना शिंदे गुटप्रफुल्ल पटेल/सुनील तटकरे-एनसीपी अजित पवार गुटजी किशन रेड्डी - बीजेपी तेलंगानाबंदी संजय - बीजेपी तेलंगानाएटाला राजेंद्र - बीजेपी तेलंगानाडी के अरुणा - बीजेपी तेलंगानाडॉ के लक्ष्मण - बीजेपी तेलंगानाराम मोहन नायडू - टीडीपी आंध्र प्रदेशहरीश - टीडीपी आंध्र प्रदेशचंद्रशेखर - टीडीपी आंध्र प्रदेशपुरंदेश्वरी - बीजेपी आंध्र प्रदेशरमेश - बीजेपी आंध्र प्रदेशबाला शौरी - जनसेना पार्टीप्रह्लाद जोशी - बीजेपी कर्नाटकबसवराज बोम्मई - बीजेपी कर्नाटकजगदीश शेट्टार - बीजेपी कर्नाटकशोभा करंदलाजे - बीजेपी कर्नाटकडॉ. सी. एन. मंजूनाथ - बीजेपी कर्नाटकएच. डी. कुमारस्वामी - जेडीएस कर्नाटकसुरेश गोपी - बीजेपी केरलवी. मुरलीधरन - बीजेपी केरलराजीव चंद्रशेखर - बीजेपी केरलएल मुरगन - बीजेपी तमिलनाडुके अन्नमलाई - बीजेपी तमिलनाडु