Narendra Modi on Constitution Day : आज (26 नोव्हेंबर) 75व्या संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'आज लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस आहेत, पण मुंबईतील लोकशाहीवरील सर्वात हल्ल्याचाही दिवस आहे. संविधान निर्मात्यांनी सांगितलेल्या पीडितांच्या इच्छा आणि स्वप्नांची पूर्तता करण्याची मोहीम काळाबरोबर सुरू आहे. संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. प्रत्येक अडचणीत संविधानाने योग्य मार्ग दाखवला आहे. संविधानाने प्रत्येक गरज आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळेच आज पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.'
पीएम मोदी पुढे म्हणतात, 'भारताच्या भवितव्याचा मार्ग मोठी स्वप्ने आणि संकल्पांच्या पूर्ततेमध्ये आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाचे जीवन मिळावे, आर्थिक आणि सामाजिक समानतेसाठी 53 कोटींहून अधिक गरीब आणि वंचितांची खाती उघडण्यात आली. 10 कोटींहून अधिक घरांना गॅस कनेक्शन मिळाले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील केवळ तीन कोटी घरांमध्ये नळाला पाणी होते, आम्ही काही वर्षांत 12 कोटी घरांना नळाचे पाणी दिले. आपल्या राज्यघटनेत भगवान राम, सीता, हनुमान, बुद्ध, महावीर, गुरू गोविंद सिंह अशा अनेक महापुरुषांचे विचार आहेत. यातून आपल्याला मानवी मूल्ये मिळतात.'
संविधान निर्मात्यांना माहीत होते...'भारताच्या आकांक्षा आणि भारताची स्वप्ने कालांतराने नवीन उंची गाठतील, हे आपल्या संविधानाच्या निर्मात्यांना माहीत होते. स्वतंत्र भारताच्या आणि भारतातील नागरिकांच्या गरजा बदलतील, आव्हाने बदलतील, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आपली राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक बनवले नाही, तर हे एक जिवंत, अखंड वाहणारा प्रवाह बनवला. आपली राज्यघटना आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. आज प्रत्येक देशवासीयांचे एकच ध्येय आहे, विकसित भारत घडवणे. संविधानाने मला दिलेल्या कामाच्या मर्यादेत राहण्याचा मी प्रयत्न केला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.