शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

Narendra Modi: "दीड खोल्यांचं घर अन् आईचे कष्ट", वाचकाला भावनिक करणारा मोदींचा ब्लॉग 'माँ'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 1:47 PM

'आई हा केवळ शब्द नाही, जीवनातील ती भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास यांसह अनेक गोष्टी सामावल्या आहेत.

अहमदाबाद - पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी आज सकाळी-सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रीं समवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तर, मोदींनी मां या नावाने भलामोठा ब्लॉग लिहून बालपणीच्या आठवणी आणि आईने घेतलेले कष्ट, दिलेले संस्कार लेखातून सांगितले आहेत. 

'आई हा केवळ शब्द नाही, जीवनातील ती भावना आहे, ज्यामध्ये प्रेम, धैर्य, विश्वास यांसह अनेक गोष्टी सामावल्या आहेत. माझी आई हरिबा आज 18 रोजी 100 व्या वर्षात प्रवेश करत आहे. तिचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळेच, मी माझा आनंद आणि नशिबवान असल्याचं सुख आपल्यासोबत शेअर करत आहे,' असे मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे. मोदींनी भलामोठा ब्लॉग लिहला असून या ब्लॉगच्या माध्यमातून आईची संघर्षगाथाच सांगितली आहे.

मोदींच्या आजीचं म्हणजेच हिराबा यांच्या आईचं त्यांच्या लहानपणीच निधन झालं. त्यामुळे, आईचं प्रेम, लाड आणि मायेची सावली हिराबा यांना मिळालीच नसल्याचं मोदींनी सांगितलं. तसेच, लहानपणापासूनच किती कष्ट आईने सहन केले, याची संघर्षकहानीच मोदींनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितली आहे. तसेच, आईसमवेतचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. ज्यामध्ये, मोदींचा काही जीवनप्रवासही उलगडला आहे.  पावसाळ्यात आमचं घर कधी इकडून टिपकत, तर कधी तिकडून टिपकत असे. संपूर्ण घरात पाणी साठू नये, घराच्या मातीच्या भिंती नीट राहाव्यात यासाठी आई घरात पाणी ठिपकत असेल तेथे भांडे ठेवत. तेच पाणी वापरासाठी आई 2-3 दिवस वापरत असे. जलसंरक्षणाचं यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण काय असू शकेल, अशी बालपणीची आठवण सांगत मोदींनी आईच्या शिकवणी आणि संस्कारांची शिदोरी सोबत घेऊनच आपण पुढे वाटचाल केल्याचं त्यांनी मां या ब्लॉगमधून सांगितलं. या ब्लॉगमधून मोदींनी आईंची जीवनकहानी सांगत अनेक प्रसंग आणि घटना कथन केल्या आहेत. मोदींचा मां हा ब्लॉग अतिशय भावनिक आणि प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMothers Dayमदर्स डेGujaratगुजरातprime ministerपंतप्रधान