शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
4
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
6
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
7
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
8
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
9
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
10
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
11
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
12
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
13
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
14
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
15
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
16
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
17
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
18
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
19
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
20
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

निवडणुकीच्या रणधुमाळीत 'Mission 100 Days' साठी झटतायेत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 1:55 PM

१०० दिवसांच्या या प्लॅनिंगमध्ये महिलांच्या नेतृत्वातील विकास, हरित अर्थव्यवस्था, स्टार्टअपसाठी भारत जगासाठी उत्पादन क्षेत्र बनवणे यासारख्या इतर विषयांचाही समावेश आहे

दिल्ली -  देशभरात एकीकडे राजकीय नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी पुढील सरकारच्या १०० दिवसांच्या योजनांवर काम करण्याची तयारीसाठी घाम गाळत आहेत. PM नरेंद्र मोदी यांनी ३ मार्चला ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली होती. आचारसंहितेपूर्वी सरकारनं सर्व सचिवांना १० प्रादेशिक विभागांचा भाग बनवलं होते. त्यात ६ सूत्री योजनांवर काम करण्यास सांगितले. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ब्ल्यू प्रिंटला अंतिम स्वरुप देण्यासाठी कॅबिनेट सचिवांसमोर प्रेझेंटेशन दिले जात आहे. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही ही कामे सुरू आहेत.

सूत्रांनी सांगितल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी ३ मार्चला सर्व सचिवांसोबत तब्बल ९ तास दिर्घ बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी देशात निवडणुका असल्या तरी नियमित कामकाज सुरू राहील. जेव्हा मी जूनमध्ये पुन्हा येईन तेव्हा मला पुढील १०० दिवसांचा आणि ५ वर्षीय योजनांचा आढावा घेईन असं म्हटलं होते.नव्या सरकारच्या १०० दिवसांच्या प्लॅनिंगनुसार, तंत्रज्ञान, डिजिटल सशक्तीकरण, AI चा वापर करून उच्च नागरिक-सक्षम सरकार बनवण्यासाठी काम सुरू आहे. यात ६ सूत्री योजना समोर आल्यात. त्यात मेक्रोइकोनॉमी, सक्षम नागरिक, मजबूत अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण नेतृत्व, प्रभावी शासन, जागतिक पातळीवर भारताला पुढे आणणं यावर चर्चा सुरू आहे.  News 18 नं याबाबत बातमी दिली आहे.

पहिल्या १०० दिवसांमध्ये नागरिकांचे अधिक सक्षमीकरण, संस्था मजबूत करणे, स्पष्टपणे परिभाषित केलेली उद्दिष्टे आणि टार्गेट, डेटा-आधारित प्रशासन आणि नियमांचे पुनरावलोकन यावर लक्ष केंद्रित करणे नव्या सरकारकडून अपेक्षित आहे.पेपर लीकविरोधी कायदा, नागरी सेवांमध्ये नवे अधिकार, ई पासपोर्टसाठी पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ करणे, जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील १०० कोटीहून अधिक कागदपत्रांचे डिजिटायलेझशन करणे, ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी ४ हजार कोटी परियोजना मंजूर करणे यासारखे प्रोजेक्ट हाती घेण्यात येणार आहेत. 

दरम्यान, १०० दिवसांच्या या प्लॅनिंगमध्ये महिलांच्या नेतृत्वातील विकास, हरित अर्थव्यवस्था, स्टार्टअपसाठी भारत जगासाठी उत्पादन क्षेत्र बनवणे यासारख्या इतर विषयांचाही समावेश आहे. नुकतेच एका मुलाखतीत मोदींनी म्हटलं होतं की, २०१९ च्या निवडणुकीत मी पुढील १०० दिवसांचं काम देऊन निवडणुकीत उतरलो होतो. त्यानंतर सरकार येताच कलम ३७० हटवण्यात आले. तीन तलाकमधून मुस्लीम भगिनींना मुक्त केले. बँकांचे मर्जर केले असं सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४