...म्हणून राहुल गांधींनी घेतली गळाभेट, मोदींनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 02:17 PM2018-07-21T14:17:36+5:302018-07-21T15:16:54+5:30
शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
शाहजहाँपूर - शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान आज उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना या गळाभेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र यांनी सांगितले. मोदी म्हणाले, आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की अविश्वास प्रस्ताव आणण्याचे नेमके कारण काय आहे. जरा सांगाल का, पण ते कारण सांगू शकले नाहीत आणि मग थेट गळ्यात पडले."
Kal sansad mein hum unse poochte rahe ki batao to sahi ki ye avishwaas ka kaaran kya hai? Ab kaaran nahi bata paaye to gale padd gaye: PM Narendra Modi in Roza, Shahjahanpur #NoConifidenceMotionpic.twitter.com/iMCoEqN78h
— ANI UP (@ANINewsUP) July 21, 2018
शनिवारी उत्तर प्रदेशाती शाहजहाँपूर येथे किसान कल्याण सभेला उपस्थित राहिलेल्या मोदींनी उस उप्तादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना उत्पादन खर्चापेक्षा 80 टक्के अधिक थेट लाभ देण्याची घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
This #NoConfidenceMotion was not moved just like that. Jab Rs 90,000 Crore idhar udhar ho gaye tab kitnon ki dukanein band ho gayi. Galat kaam band kar de, hera pheri band kar de to aisi sarkar pe wo bharoasa karenge kya?: PM Narendra Modi in Roza, Shahjahanpur pic.twitter.com/5YK1OEXQQn
— ANI UP (@ANINewsUP) July 21, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशाचे 90 हजार कोटी रुपये जे इतरत्र जात असत, ते आता योग्य व्यक्तीकडे पोहोचू लागले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे.'' यावेळी मोदींनी काँग्रेससह अन्य विरोधकांवरही जोरदार टीका केली. पंतप्रधानपदाच्या खुर्चीशिवाय त्यांना काहीही दिसत नाही. ना देश दिसत ना देशातील जनता. मी भ्रष्टाचार आणि परिवावादाविरोधात लढत आहे हेच त्यांचे दुखणे आहे, असे ते म्हणाले.