नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होण्यापूर्वी पक्षात अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. विद्यमान खासदार आणि माजी मंत्र्यांच्या एका घटनेने सामूहिक नेतृत्वाची मागणी केली आहे. तर आणखी एका गटाकडून राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाचे अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही माजी मंत्र्यांसह दोन अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून संघटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली आहे, तर राहुल गांधी यांच्या जवळच्या काही नेत्यांनी सीडब्ल्यूसीला पक्षाच्या अध्यक्षपदावर परत येण्यासाठी पत्र लिहिले आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून पक्ष सध्या दोन गटांत विभागला गेला आहे.
यातच राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी आसामच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधींना घाबरतात. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनविण्याचे आवाहन आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी सोनिया गांधी यांना केले आहे.
दरम्याान, काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू असून, गेल्या वर्षभरापासून पक्षाचे हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेल्या सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची घोषणा केली आहे. आपला अध्यक्षपदावरील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे आपण आता अध्यक्षपद सोडणार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
पक्षाला प्रभावी, पूर्ण वेळ नेतृत्वाची गरज; २३ बड्या नेत्यांचं सोनिया गांधींना पत्रगेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी अतिशय वाईट झाली आहे. यानंतरही पक्षात फारसे बदल झालेले नाहीत. पक्ष अतिशय मोजक्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत. त्यातही पक्षांतर्गत नाराजीचे सत्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. पक्षाला मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.