‘१० झाली, अजून २० वर्षे बाकी’, काँग्रेसच्या एक तृतियांश सरकार टीकेला मोदींचं प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:02 PM2024-07-03T14:02:10+5:302024-07-03T14:03:02+5:30

Narendra Modi Speech in Rajya Sabha: काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी (Narendra Modi) राज्यभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पलटवार केला.

Narendra Modi Speech in Rajya Sabha: '10 done, 20 more years to go', Modi's response to one-third Congress government criticism   | ‘१० झाली, अजून २० वर्षे बाकी’, काँग्रेसच्या एक तृतियांश सरकार टीकेला मोदींचं प्रत्युत्तर  

‘१० झाली, अजून २० वर्षे बाकी’, काँग्रेसच्या एक तृतियांश सरकार टीकेला मोदींचं प्रत्युत्तर  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान, नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षांमधील आमच्या सहकाऱ्यांनी आमच्या सरकारला एक तृतियांश सरकार म्हटलं. हो, आमचं सरकार हे एक तृतियांश सरकार आहे. आमच्या सरकारची दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. सरकारची २० वर्षे अद्याप बाकी आहेत.

काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारचा उल्लेख एक तृतियांश सरकार असा केला होता. त्यावर आज मोदींनी राज्यभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पलटवार केला. मोदी म्हणाले की, ६० वर्षांनंतर देशात  कुठलंही सरकार हे तिसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे. सहा दशकांनंतर घडलेली ही घटना असामान्य आहे. काही लोक जाणून बुजून तोंड लपवून बसली आहे. त्यांना काही समजलं नाही. मात्र ज्यांना समजलं त्यांनी हुल्लडबाजी करून देशातील जनतेच्या विवेकबुद्धीसमोर अंधार आणण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोदी म्हणाले की, या निवडणुकीत देशवासियांनी दाखवलेल्या विवेकबुद्धीबाबत मला अभिमान वाटतो. कारण त्यांनी प्रोपेगेंडाला पराभूत केले. देशाच्या जनतेने कामगिरीला प्राधान्य दिलं. जनतेने विश्वासाच्या राजकारणावर मोहोर उमटवली आहे. राज्यघटनेला ७५ वर्षे झाली आहेत. राज्यसभेलाही ७५ वर्षे झाली आहेत. माझ्यासारखे अनेक लोक असे आहेत, ज्यांच्या कुटुंबातील लोकांनी गावचं सरपंचपदही भूषवलेलं नाही. मात्र आज महत्त्वपूर्ण पदांवर पोहोचून देशाची सेवा करत आहेत. त्याचं कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आहे. माझ्यासारख्या अनेक जणांना त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याची संधी मिळाली आहे.  

Web Title: Narendra Modi Speech in Rajya Sabha: '10 done, 20 more years to go', Modi's response to one-third Congress government criticism  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.