शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 1:31 PM

नरेंद्र मोदींनी सर्वाधिक २०६ रॅली केल्या, तर राहुल गांधींनी १०७ रॅलीतून आपला मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: भाजप व काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीदरम्यान रात्रीचा दिवस करून मेहनत घेतली. भाजपकडून नरेंद्र मोदींकडून सर्वाधिक २०६ रॅली आणि रोड, तर राहुल गांधींनी १०७  रॅलीत रोड शो आणि सभांतून आपला मुद्दा जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी प्रचारात प्रत्येक टप्प्यात विविध मुद्दे उपस्थित करत विरोधकांना हैराण केले, तर राहुल गांधी यांचा प्रचार संविधानाचे संरक्षण आणि पाच घोषणाभोवती केंद्रित राहिला.

नरेंद्र मोदी - दरवेळी नवा मुद्दा

  • नरेंद्र मोदींच्या रॅली, सभा

उत्तर प्रदेश ३१, बिहार २०, महाराष्ट्र १९, बंगाल १८, ओडिशा १०, मध्य प्रदेश १०, गुजरात ५, पंजाब ४, हरयाणा ३, हिमाचल २, दिल्ली २, उत्तराखंड २, जम्मू-काश्मीर १, पूर्वोत्तर २

नरेंद्र मोदींनी केलेली प्रमुख वक्तव्ये

  • विरोधक सनातन संपवतील
  • इंडिया आघाडीची मंगळसूत्रावर नजर
  • काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल
  • काँग्रेस रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवेल
  • इंडिया आघाडी जिंकल्यास प्रत्येक वर्षी पंतप्रधान बदलेल
  • ते हिंदूंना भगीरथी नदीत बुडवतील 
  • विरोधकांना आपल्या पिचवर खेळविले

१९ एप्रिलपर्यंत मोदींनी आक्रमक टीका केली नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यापासून त्यांनी कठोर वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. महिलांचे मंगळसूत्र ते मुस्लीमांना धर्माच्या आधारावर आरक्षण या वक्तव्यांमुळे मोदींनी विरोधकांना आपल्यावर पिचवर फसविण्याचा प्रयत्न केला.

  • ३६० डिग्रीमध्ये फिरले मोदी

मोदींनी गुरुवारी पंजाबमध्ये शेवटची सभा घेत ध्यान करण्यासाठी ते थेट कन्याकुमारीला पोहोचले. मोदींनी १५ मार्च रोजी कन्याकुमारीत प्रचार सुरू केला होता.

-----------------

  • राहुल गांधी - पाच मुद्द्यांवर ठाम

  • राहुल गांधींच्या रॅली, सभा

यूपी १७, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली प्रत्येकी ६, म. प्रदेश ५, केरळ १४, महाराष्ट्र १३, पंजाब ४, राजस्थान, ओडिशा, गुजरात प्रत्येकी ३, हरयाणा ४, हिमाचल २, झारखंड २, तामिळनाडू २, छत्तीसगड २

राहुल गांधींनी केलेली प्रमुख वक्तव्ये

  • बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला ८,५०० रुपये देणार
  • आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर नेणार
  • महिलांना प्रत्येक वर्षी १ लाख रुपये
  • महिलांचे आरक्षण तत्काळ लागू
  • शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी
  • लोकशाही आणि संविधान वाचविणार 
  • आरक्षणावरून राहुल गांधींनी भाजपला घेरले

राहुल गांधी यांनी पाच न्याय गॅरंटीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी भाजपच्या ४०० पारचा नारा मुद्दा बनवत भाजप नेते आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावरून भाजप मोठ्या प्रमाणात अडकली. यावरून मोदींना सतत उत्तर द्यावे लागले.

  • राहुल गांधी बदलले

राहुल गांधी यांनी आपली भाषणशैली वेगळी ठेवली. त्यांनी प्रत्येक सभेत हातात संविधानाची प्रत घेऊन भाषण केले. मेट्र, टेम्पोतून लोकांशी संवाद साधला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी