नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 12:24 PM2024-05-15T12:24:40+5:302024-05-15T12:25:55+5:30
या शपथपत्रात संबंधित उमेदवाराकडे किती सोने, किती चांदी, किती घरे अथवा बँक बॅलेन्स आहे, हेही सांगितेल जाते. आता दोन्ही नेत्यांची शपथपत्रे आल्यानंतर, जाणून घेऊयात कुणाकडे किती संपत्ती?
संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आपल्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक करणेही आवश्यक असते. पंतप्रधान नरेद्र मोदी हे वाराणसी अथवा काशीतून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपले शपथपत्रही सादर केले आहे. त्यानुसार ते एकूण तीन कोटी रुपयांचे मालक आहे. तर, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही काही आठवड्यांपूर्वी वायनाडमधून उमेदवारी दाखल करत शपथपत्र सादर केले. त्यांत त्यांनी त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले होते. या शपथपत्रात संबंधित उमेदवाराकडे किती सोने, किती चांदी, किती घरे अथवा बँक बॅलेन्स आहे, हेही सांगितेल जाते. आता दोन्ही नेत्यांची शपथपत्रे आल्यानंतर, जाणून घेऊयात कुणाकडे किती संपत्ती?
PM मोदी यांची संपत्ती... -
एकूण संपत्ती - 3 कोटी रुपये
चल संपत्ती - 3 कोटी 2 लाख सहा हजार 889 रुपये
अचल संपत्ती - ० (ना घर, ना जमीन)
बँकेत - 2.85 कोटी रुपये
रोख - 52,920 रुपये
देणे - काहीही नाही
2014 मधील संपत्ती - 1.65 कोटी रुपये
गुंतवणूक कुठे - बँक FD, राष्ट्रीय बचत पत्र
सोनं - 4 अगठ्या (45 ग्रॅम)
केस - 0
पत्नी - जशोदाबेन
मागील आयकर - 3.33 लाख रुपये
शिक्षण - एमए (1983)
राहुल गांधी यांची संपत्ती... -
कुल संपत्ती - 20 कोटी रुपये
चल संपत्ती - 9,24,59,264 रुपये
अचल संपत्ती - जमीन (दिल्ली), ऑफिस स्पेस (गुरुग्राम)
बँकेत - 26.25 लाख
रोख - 55,000 रुपये (3-4 एप्रिल 2024)
देणे - 49,79,184 रुपये
2014 मधील संपत्ती - 9.4 कोटी रुपये
गुंतवणूक कुठे - म्यूचुअल फंड, बॉन्ड
सोनं - 333.3 ग्रॅम सोनं
केस - 18 प्रकरणं
पत्नी - ---
मागील आयकर - 1 कोटी + कमाईवर टॅक्स देतात
शिक्षण - एम फिल (कॅम्ब्रिज विद्यापीठ, 1995)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीतून आपली उमेदवारी दाखल केली आहे. शपथ पत्रात मोदींची पत्नी म्हणून जशोदाबेन यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. मात्र, त्यांच्या संपत्तीसंदर्भात 'माहीत नाही' असे म्हणण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी आपण अहमदाबादचे रहिवासी असल्याचे म्हटले आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक निवासी भूखंड, 1.27 कोटी रुपयांची एफडी आणि 38,750 रुपयांची रोख साहित्य, अशा प्रकारे 2.50 कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली होती.