Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील द्वारका स्थित इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर ‘यशोभूमी’ चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली आणि 18 कामगारांना प्रमाणपत्रही दिले. यावेळी मोदी म्हणाले की, विश्वकर्मा हा देशाचा कणा आहे. आजचा दिवस देशातील कारागिरांना समर्पित आहे. विश्वकर्मा योजनेवर 13 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात विश्वकर्मांच्या प्रशिक्षणावर भर दिला जाईल.
बँक हमी देत नाही तेव्हा...इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (IICC) - ‘यशोभूमी’ च्या फेज-1 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज विश्वकर्मा जयंती आहे, हा दिवस कारागिरांना समर्पित आहे. मी देशाला विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देतो. बँका हमी देत नाहीत तर मोदी हमी देतो. विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मला हे करण्याची संधी मिळाली, याचा खूप आनंद आहे. 'पीएम विश्वकर्मा' योजना देशातील कारागीरांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येईल.
विश्वकर्मांनाचा फायदा होईल मोदी पुढे म्हणाले, 'वोकल फॉर लोकल' मोहिमेचा उद्देश घरगुती वस्तूंचा प्रचार करणे आहे आणि ही सर्वांची जबाबदारी आहे. ही यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. विश्वकर्मा मित्रांची ताकद आणि समृद्धी वाढवण्यासाठी आमचे सरकार पुढे आले आहे. या योजनेत 18 विविध प्रकारची कामे करणाऱ्या विश्वकर्मा सहकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये सुतार, लोहार, सोनार, कुंभार, शिल्पकार, चांभा, न्वावी, फुले विकणारे, शिंपी इत्यादींचा समावेश आहे. भारतातील ही स्थानिक उत्पादने जागतिक बनवण्यात मोठी भूमिका बजावली जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले.
लोगो आणि पोर्टलचेही लोकार्पण केलेभारतीय हस्तकला जगात लोकप्रिय बनवण्यात हे केंद्र मोठी भूमिका बजावेल. विश्वकर्मा यांना ओळखून त्यांना सर्वतोपरी साथ देणे, ही काळाची गरज आहे. द्वारका येथे यशोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (IICC) च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी आज 'PM विश्वकर्मा' योजनेचा लोगो, प्रतीक आणि पोर्टलचे अनावरण केले.