चंद्रकांत कित्तुरेदेशभरातील जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवलेल्या मोदींनी सत्तेवर येताच काही लोकप्रिय निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती घसरल्या. परिणामी, देशातील पेट्रोल, डिझेल, गॅसचे दरही कमी झाले. महागाईचा दर कमी झाला. शिवाय हिंंदुत्ववादाला बाजूला ठेवत मोदींनी आर्थिक, सामाजिक आणि विकासाच्या मुद्द्यांवर प्रचारात भर देत सामाजिक ध्रुवीकरण (सोशल इंजिनीअरिंंग) करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांचा परिणाम म्हणून चारही राज्यांत भाजपाला सत्ता मिळाली. मात्र अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने ती भाजपावरच बुमरॅँगप्रमाणे उलटविली आणि मोदींचा अश्वमेधाचा वारू रोखला.-------------केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाला या वर्षभरात काय मिळाले याचा विचार करता ४ राज्यांतील सत्ता मिळाली. शिवाय देशभर आपला पाया मजबूत करण्याची एक मोठी संधी आणि त्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने हरियाणा आणि झारखंडमध्ये एकहाती सत्ता खेचून आणली; तर महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये आघाडी सरकार स्थापन केले.मे २०१४मध्ये लोकसभा निवडणूक भाजपाने मोदी लाटेवर जिंकली. मोदी पंतप्रधान झाले. त्यापाठोपाठ आॅक्टोबरमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या तर डिसेंबरमध्ये झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाट या चारही निवडणुकींत कायम असल्याचे दिसले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा विचार करता शिवसेनेशी असलेली २५ वर्षांची सोयरिक तोडून भाजपाने येथे स्वबळावर निवडणूक लढविण्याचा जुगार खेळला. प्रत्यक्षात निवडणुकीनंतर तो जुगार नव्हता तर जाणीवपूर्वक केलेली खेळी होती, हे सिद्ध झाले. २८८ सदस्यीय विधानसभेत १२२ जागा जिंकत भाजपा सर्वांत मोठा पक्ष बनला. गेल्या विधानसभेत या पक्षाचे संख्याबळ केवळ ४५ होते. त्यामध्ये ७६ची भर पडली. बहुमतासाठी लागणारे संख्याबळ मात्र प्राप्त करता आले नाही. तथापि १५ वर्षांची कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता संपुष्टात आली. दोन्ही काँग्रेसच्या कारभारास कंटाळलेली जनता हेही या सत्तांतराचे एक कारण होते. विधानसभेतील सर्वांत मोेठा पक्ष म्हणून भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन केली; पण ती टिकविण्यासाठी शिवसेनेशी पुन्हा सोयरिक करावी लागली. असे असले तरी भाजपा आता मोठ्या भावाच्या आणि शिवसेना छोट्या भावाच्या भूमिकेत आहे. लोकसभा निवडणुकीत हरियाणामधील १०पैकी ७ जागा जिंकून भाजपाने तेथेही मोठे यश मिळविले होते. मोदी लाटेचाच तो प्रभाव होता. आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो कायम राहिला; आणि पक्षाने ९०पैकी ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे २००९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ चारच जागा जिंंकता आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हे यश अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल.डिसेंबर २०१४मध्ये झालेल्या झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा प्रभाव कायम राहिला. झारखंडमध्ये २००५ आणि २००९च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे ३० आणि १८ जागा जिंकत आघाडी सरकार स्थापन केले होते. या वेळच्या निवडणुकीत मात्र तब्बल ५१ टक्क्याहून अधिक मते मिळविताना भाजपाने ८१पैकी ४३ जागा जिंकल्या आणि स्पष्ट बहुमत मिळविले.जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीतही भाजपाने प्रथमच प्रचंड यश मिळविताना २५ जागा जिंकल्या. पीडीपी २८ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष बनला. मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तेचे त्रांगडे बरेच दिवस कायम होते. अखेर भाजपा आणि पीडीपीने आपल्या पारंपरिक भूमिका बाजूला ठेवत एकत्र येऊन तेथे सत्ता स्थापन केली आहे. अशा प्रकारे भाजपा तेथे प्रथमच सत्तेत आला आहे. याचाच अर्थ मे २०१४नंतर झालेल्या दिल्ली वगळता सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश मिळवले. मोदींच्या या यशात पक्षाध्यक्ष अमित शहा यांचाही वाटा मोलाचा आहे किंबहुना मोदींच्या राजकीय यशाचे, डावपेचांचे सूत्रधार तेच आहेत.२०१५ सालात मात्र या यशाला दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ‘ब्रेक’ लावला. आम आदमी पार्टीने सर्व विरोधी पक्षांचा सफाया करीत ६७ जागा जिंकून सत्ता स्थापन केली; यानंतर मात्र मोदी लाट ओसरली. ‘अच्छे दिन’ सर्वसामान्यांसाठी स्वप्नच राहणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या वर्षी होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काय होते यावरच मोदींचा करिष्मा कायम आहे की तो ओसरतोय हे स्पष्ट होणार आहे. हिंदी भाषिक राज्यात सत्तालोकसभा निवडणुकीत हरियाणामधील १०पैकी ७ जागा जिंकून भाजपाने तेथेही मोठे यश मिळविले होते. मोदी लाटेचाच तो प्रभाव होता. आॅक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही तो कायम राहिला आणि पक्षाने ९०पैकी ४७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. तेथे २००९च्या विधानभा निवडणुकीत भाजपाला केवळ चारच जागा जिंंकता आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हे यश अभूतपूर्व असेच म्हणावे लागेल.असे असले तरी आजमितीस केवळ हिंदी भाषिक पट्ट्यातील पक्ष समजला जाणारा भाजपा देशातील सर्वाधिक ८ राज्यांत स्वबळावर तर ४ राज्यात आघाडी करून सत्तेवर आहे. यामध्ये गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, आंध्र प्रदेश, नागालॅँड या राज्यांचा समावेश आहे. या ठिकाणी भाजपा काय कामगिरी करते हे पाहावे लागेल. 2015 सालात मात्र या यशाला दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ‘ब्रेक’ लावला. मोदी लाटेच्या करिष्म्यावर दिल्ली जिंकायला निघालेल्या भाजपाने ७०पैकी अवघ्या ३ जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीने सर्व विरोधी पक्षांचा सफाया करीत ६७ जागा जिंकून सत्ता स्थापन केली; यानंतर मात्र मोदी लाट ओसरली.
नरेंद्र मोदींच्या वारूला ‘आम आदमी’चा ‘ब्रेक’
By admin | Published: May 11, 2015 4:34 AM