शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

वाचाळवीरांवर मोदींची वक्रदृष्टी

By admin | Published: March 07, 2016 11:16 PM

वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीवादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांवर मोदींना आता थेट कारवाईच हवी आहे. अशा वाचाळवीरांसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. भाजपशासित राज्ये आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला त्यांनी तसे सूचितच केले आहे की, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. तथापि, असा प्रयत्न कोणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवाद विरुद्ध स्वातंत्र्याची ही चर्चा देशात उग्र रूप धारण करू शकते. कायदेविषयक संस्थांनी अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींनी कडक संकेत दिलेले असतानाच त्याचा पोलीस कृतीतील प्रत्यय दिल्ली आणि छत्तीसगढमधील रायपूरमध्ये आला. दिल्ली पोलिसांनी पूर्वांचल सेनेचा प्रमुख आदर्श कुमार याला सोमवारी अटक केली. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयावर याच आदर्श कुमारने दोन दिवसांपूर्वी ११ लाखांचे इनाम ठेवले होते. दरम्यान, छत्तीसगढमध्ये स्थानिक चर्चमध्ये नासधूस करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा घटनांत पोलीस कारवाईच होत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या भुवया मात्र यानिमित्ताने उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वांचल सेनेच्या ज्या आदर्श कुमारला दिल्ली पोलिसांनी रोहिणी भागातून अटक केली तोसुद्धा बिहारमधील बेगुसराईचा असल्याचे उघड झाले. कन्हैया कुमारही बेगुसराईचाच आहे. पोलीस त्याच्या पूर्वेतिहासाची अजून खातरजमा करीत आहेत; परंतु आदर्श हा कन्हैया कुमारला माहीत नाही.हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्यांनी असल्या प्रवृत्तींशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही याचे संकेत आधीच दिले आहेत. भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगढच्या रायपूरमध्ये स्थानिक चर्चची नासधूस करणाऱ्या नऊ जणांना (त्यात सहा जण अल्पवयीन आहेत) अटक करण्यात आली आहे. या नऊ जणांचा उजव्या विचारांच्या शक्तीशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरीही या सगळ्यांनी आमचा उजव्या विचारसरणीशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे. हल्ला झाला त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरल्यावर (व्हायरल) पोलीस हल्लेखोरांना ओळखू शकले. सत्ताधारी पक्षाच्या व्यवस्थापकांना जेएनयूमधील घटना हे मोठा फायदा देणारे घबाडच असल्याचे वाटते. एवढेच काय कन्हैयाचे पाठीराखेही महत्त्वाच्या प्रश्नांवर बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत.