'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 03:39 PM2024-08-22T15:39:14+5:302024-08-22T15:43:15+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत.
Rahul Gandhi in Jammu-Kashmir : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharage) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते स्थानिक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान, आज राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) बोचरी टीका केली.
काश्मीरचे प्रतिनिधित्व आमच्यासाठी महत्त्वाचे आहे
राहुल गांधी म्हणाले की, 'जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा आम्ही सर्वात आधी जम्मू-काश्मीरला जाण्याचे ठरवले होते. आम्हाला देशातील जनतेला संदेश द्यायचा आहे की, आमच्यासाठी जम्मू-काश्मीरच्या लोकांचे प्रतिनिधित्व सर्वात महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा दर्जा काढून त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहे.'
#WATCH | Addressing Congress workers in Srinagar, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "...During the (Lok Sabha) elections the INDIA alliance has destroyed Narendra Modi's confidence...He was not defeated by Rahul Gandhi but by the ideology of the Congress Party,… pic.twitter.com/XtzautyUsI
— ANI (@ANI) August 22, 2024
मला तुमची भीती दूर करायची आहे
राहुल गांधी पुढे म्हणतात, 'तुम्ही ज्या भीतीमध्ये राहता, त्या भीतीला मी पूर्णपणे नष्ट करेन. तुम्हा लोकांना काय सहन करावे लागते, हे मला माहीत आहे. आम्ही आघाडी करू, पण ती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सन्मानाने केली जाईल. तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्ष वाढवण्यात आणि भारताचे रक्षण करण्यात घालवले आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेचे प्रश्न सोडवले जातील, काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभा आहे, अशी मी ग्वाही देतो.' .
"राहुल गांधींच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढणार"; खर्गे यांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास संपवला...
'लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला. नरेंद्र मोदींचा पराभव राहुल गांधींनी नव्हे, तर काँग्रेस पक्ष, इंडिया आघाडी, प्रेम, एकता आणि आदराच्या विचारसरणीने केला आहे. आपल्याला द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायचे आहे. द्वेषाचा, प्रेमानेच पराभव केला जाऊ शकतो आणि आपण सर्व मिळून द्वेषाचा प्रेमाने पराभव करू, " असेही ते यावेळी म्हणाले.