शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नरेंद्र मोदी सरकारचा केवळ दिखाऊपणा

By admin | Published: August 30, 2015 10:17 PM

मोदी सरकारने ‘शोबाजी’शिवाय काहीही केले नाही. याउलट मनरेगासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनेच्या निधीत मोठी कपात केली. केवळ आश्वासने देणाऱ्या

पाटणा : मोदी सरकारने ‘शोबाजी’शिवाय काहीही केले नाही. याउलट मनरेगासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजनेच्या निधीत मोठी कपात केली. केवळ आश्वासने देणाऱ्या सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाटण्यातील स्वाभिमान रॅलीत प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित सभेत सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी एकाच व्यासपीठावर येत संयुक्त प्रचाराचा नारळ फोडला.मोदी सरकारने आपल्या कार्यकाळाचा एकचतुर्थांश भाग पूर्ण केला आहे. या सरकारने आजपर्यंत शोबाजीशिवाय काहीही केले नाही. हे तुम्ही माझ्यापेक्षा चांगले जाणता. केंद्र सरकारने एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. दुसरीकडे सरकारी नोकऱ्यांमधील संधी सीमित केल्या आहेत. बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. चंद्रगुप्त, चाणक्य, गुरू गोविंदसिंग, बाबू वीर कुंवरसिंग याच भूमीवर वाढले. मी येथील स्वाभिमानी लोकांना प्रणाम करते. मोदींनी मात्र डीएनएबद्दल शेरेबाजी करीत बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे. येथील जनतेला चुकीच्या रूपात दाखविले. काही लोकांना बिहारची टर उडविण्यात आनंद मिळतो. त्यांनी संधी मिळेल तेव्हा बिहारचा अपमान केला आहे. या राज्यातील लोकांच्या डीएनएमध्ये बिघाड असल्याचे सांगत या राज्याला अपमानित केले आहे. कधी बिहारला बिमारू राज्य म्हटले आहे. काँग्रेसने नेहमी या राज्यातील जनतेचा सन्मान आणि प्रतिभेचा आदर केला आहे, असेही त्या म्हणाल्या. मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काळा पैसा परत आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ ते २० लाख रुपये जमा करण्याचे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना त्यातील ५ ते १० टक्के रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. युवकांना नोकऱ्यांचे वचन दिले. आता लोकांची फसगत झाल्याची भावना झाली आहे, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले. १४ महिन्यांनंतर बिहारची आठवण आली आणि त्यांनी १.२५ लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. त्यातील ८७ टक्के रक्कम जुन्याच योजनांसाठीची आहे. रिपॅकेजिंगला विशेष पॅकेज संबोधण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. माझ्या डीएनएला आव्हान देणाऱ्यांच्या पूर्वजांचे स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही योगदान नव्हते, असा उल्लेखही त्यांनी केला.मोदींनी भूसंपादन वटहुकूम जारी न करण्याची घोषणा केल्याबद्दल नितीशकुमार यांनी आजचा दिवस आनंदाचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.गांधी मैदानावर स्वाभिमान रॅलीच्या स्थळी रविवारी डीएन नमुने गोळा करण्यासाठी ८० काऊंटर उघडण्यात आले होते. ‘शब्दवापसी’ या मोहिमेंतर्गत जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी लोकांना डीएनए गोळा करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्लास्टिकच्या पाऊचमध्ये अनेकांनी केस आणि नखांचे नमुने देत सहभाग नोंदविला. मोदी यांचे निवासस्थान असलेल्या ७ रेसकोर्स रोडवरील निवासस्थानाचा पत्ता पाकिटावर नोंदविण्यात आला आहे.(वृत्तसंस्था)