पुणे : ‘‘आज २०१७ साल आहे. आपण २०२२ पर्यंतचे धेय निश्चित करा. मग, ते शिक्षण असो, की ऊर्जा क्षेत्र. मात्र, ठोस कार्यक्रम समोर ठेऊन काम केल्यास नवभारताचे स्वप्न साकार करु शकतो. त्यासाठी प्रतिज्ञा घ्या,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.अध्यात्मिक गुरुदादा जे. पी. वासवानी यांच्या ९९व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वासवानी यांच्याशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांचे आशीर्वाद घेतले. दादाजींच्या येणाºया शतकसंवत्सरी वर्षानिमित्त समाज सेवेसाठी काम करण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन त्यांनी भक्तांना केले. कॅम्प येथील, साधू वासवानी मिशनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.मोदी म्हणाले, २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यासाठी झटलेल्या वीरांचे समाजाप्रति असलेले संकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जागतिक हवामान झपाट्याने बदलत असल्याने प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. त्यासाठी झाडे लावण्याचे धोरणदेखील राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपला परिसरदेखील स्वच्छ असला पाहिजे. रस्ते, बस स्टॉप आणि सार्वजनिक ठिकाणे कामगारांकरवी स्वच्छ ठेवतादेखील येतील. मात्र, त्यात सातत्य राखण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.सर्वांप्रति प्रेमभावना ठेवावासवानी यांनी आपल्या संदेशात, सर्वांप्रती प्रेमाची भावना ठेवण्याचे आवाहन केले. तसेच उत्तम आरोग्यासाठी शरीरसंपदा टिकवा, सदृढ मानाला पुस्तकांचे खाद्य पुरवा, असा उपदेश केला.
पंतप्रधान मोदींचा नवभारताचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:42 AM