नवी दिल्ली- राज्यसभेच्या उपाध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीने नियुक्ती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेत सर्वाधीक सदस्य असले तरी बहुमत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. 1 जुलै रोजी पी. जे. कुरियन यांचा उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवा उपाध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधकांना सर्व सहमतीने कुरियन यांच्या जागी योग्य व्यक्तीची नेमणूक करावी आसे आवाहन केले आहे.
कोण आहेत नरेश गुजराल ? नरेश गुजराल हे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे पूत्र आहेत. त्यांचा जन्म 19 मे 1948 रोजी पंजाबातील जालंधर येथे झाला. शिरोमणी अकाली दलातर्फे ते राज्यसभेत निवडून गेले आहेत. त्यांचे शिक्षण नवी दिल्लीमधील सेंट स्टीफन्स महाविद्यालयात झाले. राज्यसभेतील एक अभ्यासू खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. गुजराल संसदेतील विविध अभ्यासविषयगटांचे सदस्य आहेत.