मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लोक एका महिलेला 'नर्मदा माँ' मानून तिची पूजा करू लागले. ही महिला पाण्यावर चालते असं लोकांचं म्हणणं होतं. याशिवाय तिचे कपडेही पाण्यात भिजत नाहीत असा दावाही केलाही महिला नर्मदेच्या पाण्यात चालत असल्याचा दावा करणाऱ्या एका व्हिडिओमुळे ही अफवा पसरली होती. पण आता या घटनेमागचं सत्य समोर आलं आहे.
महिलेने स्वतः हा कथित चमत्कार नाकारला आहे. अफवेनंतर मोठ्या संख्येने लोक पूजा करण्यासाठी नर्मदेच्या काठावर पोहोचले. प्रचंड गर्दीमुळे प्रशासनाचीही दमछाक झाली. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती महिला नर्मदेच्या खोल पाण्यावर फिरत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की 51 वर्षीय महिलेला रातोरात लोक नर्मदा देवी म्हणायला लागले.
नर्मदा देवीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. नंतर वृद्ध महिलेने स्वत: सत्य सांगितल्यावर लोकांना धक्काच बसला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीबाई रघुवंशी असे महिलेचे नाव आहे. ती नर्मदापुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे वय 51 वर्षे आहे. ती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. गेल्या वर्षी ती घरच्यांना न सांगता घरातून निघून गेली. नर्मदेची परिक्रमा करत होती असे त्यांचे म्हणणे आहे.
परिक्रमेदरम्यान ती कधी कधी नर्मदेच्या पाण्यात शिरते, असे महिलेने स्वतः सांगितले. आंघोळीनंतर पूजेसाठी वेळ लागत असल्याने तिचे कपडे अनेकदा सुकतात असं म्हटलं आहे. प्रचंड गर्दी आणि लोकांची अंधश्रद्धा पाहून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि नंतर तिला घरी सोडण्यास निघाले. महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"