नवी दिल्ली - काँग्रेस कार्यकारणीची आज बैठक आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वाबद्दल लिहिलेल्या पत्रानं बैठकीत घमासान सुरू आहे. या पत्राच्या 'टायमिंग'वर बोट ठेवत राहुल यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याचा अतिशय गंभीर आरोप राहुल यांनी केला. त्यामुळे बैठकीतील वातावरण तापलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा अशी मागणी देशातल्या 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे पत्राद्वारे केली.
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून थेट प्रियंका गांधी यांच्या मुलांच्या नावांचा दावेदारीसाठी विचार करता येईल असा सल्ला मिश्रा यांनी दिला आहे. तसेच ''काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार'' असं म्हणत नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
"काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक पात्र उमेदवार त्यांच्या पक्षाकडे आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, रिहान वाड्रा, मिरयाना वाड्रा यांचा समावेश आहे. काँग्रेस ही अशी शाळा आहे जिथे मुख्याध्यापकांची मुलं पहिली येतात, हे काँग्रेसच्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे" असं नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केलं आहे.
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधींनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त केली. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहिण्यात आलेल्या पत्राच्या टायमिंगवर राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहिण्यात आलं, त्या पत्रावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमांमध्ये कसं गेलं, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या
"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक
कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक
CoronaVirus News : रशियानंतर 'या' देशाने तयार केली कोरोना लस; आपत्कालीन स्थितीत 2 लसींना मंजुरी