कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:27 PM2022-06-28T12:27:23+5:302022-06-28T12:27:32+5:30

एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली. 

narsinghpur software engineer it company 30 year old girl became sarpanch | कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच

कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गावी आल्यानंतर केला विकासाचा संकल्प; 30 वर्षांची तरुणी झाली सरपंच

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांनी नोकरी गमावली. तर काहींनी शहरापेक्षा आपलं गाव बरं असं म्हटलं. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील एका तरुणीने गावाचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाचा विकास करण्याच्या ध्यासाने तिने ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि ती सरपंच झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात ही घटना आहे. जिल्ह्यातील ठूटी गावात आकांक्षा कौरव ही 30 वर्षांची तरुणी सरपंच म्हणून निवडून आली आहे. तीन जण या निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचा पराभव करत आकांक्षाने कारवाई केली आहे. तिच्या विरोधात असलेल्या एका उमेदवाराला 28, दुसऱ्याला 47 तर तिसऱ्याला 188 मतं मिळाली. आकांक्षाला एकूण 557 मतं मिळाली. म्हणजेच, एकूण 377 अशा मताधिक्याने लोकांनी तिची सरपंच म्हणून निवड केली आहे.

आकांक्षाने दिलेल्या माहितीनुसार, तिने आयटी इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने दोन वर्षं सॉफ्टवेअर कंपनीत काम केलं. त्यानंतर तिने यूपीएससी (UPSC) परीक्षेसाठी तयारी सुरू केली. शहरात तिची यूपीएससीची तयारी सुरू असतानाच कोरोना महामारीची लाट आली. कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे आकांक्षा पुन्हा आपल्या गावी परतली. शहरातून गावात आल्यानंतर आकांक्षाला जाणवलं की, गावात कित्येक सुविधांचा अभाव आहे. आकांक्षाने गावातच थांबून गावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: narsinghpur software engineer it company 30 year old girl became sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.