शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

नसीरुद्दीन-अनुपम यांच्यात जुंपली

By admin | Published: May 29, 2016 1:04 AM

काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून बॉलीवूड स्टार नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात जुंपली आहे. काश्मिरी पंडितांबाबत आपण चालविलेल्या मोहिमेवर टीका करणाऱ्या नसीरुद्दीन

नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून बॉलीवूड स्टार नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्यात जुंपली आहे. काश्मिरी पंडितांबाबत आपण चालविलेल्या मोहिमेवर टीका करणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांचे विधान दुर्भाग्यपूर्ण असल्याचे अनुपम खेर यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अनुपम खेर म्हणाले की, प्रथम मला विश्वासच बसला नाही की, नसीरुद्दीन शाह हे असे काही बोलू शकतात. पण, त्यांनी असे म्हटले असेल तर निश्चित हे दुर्भाग्य आहे. नसीरुद्दीन हे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात त्या काळात मला वरिष्ठ होते. मी त्यांचा खूप सन्मान करतो. पण काश्मीरशी माझा काही संबंध नाही, ही बाब मान्य जरी केली तरी तेथील नागरिकांबाबत मी प्रश्न उपस्थित करू शकत नाही का? त्यांनी असे विधान का केले हे मी सांगू शकत नाही. पण त्यांच्या तर्कानुसार विदेशातील भारतीय नागरिकांना भारतासाठी काम करण्याचा अधिकार नाही किंवा दिल्लीत राहणारा एखादा व्यक्ती गुजरातच्या समस्येवर आवाज उठवू शकत नाही. नसीरुद्दीन शाह यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. काय आहे वाद? काश्मिरी पंडितांसाठी मोहीम चालविणाऱ्या अनुपम खेर यांच्याविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, काश्मिरी पंडितांच्या हक्कासाठी अशी व्यक्ती संघर्ष करत आहे जी व्यक्ती कधी काश्मिरात राहिलीच नाही आणि विस्थापित झाली आहे.