नशिराबादला जंगली प्राण्यांचा धुमाकूळ पिकांची नासधूस शेतकरी त्रस्त
By admin | Published: January 28, 2016 10:59 PM
नशिराबाद- नशिराबाद शिवारात सुनसगाव भागपूर परिसरात जंगली प्राण्यांचा धूमाकूळ वाढला असून शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासधूस होत आहे त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे. जंगली प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.
नशिराबाद- नशिराबाद शिवारात सुनसगाव भागपूर परिसरात जंगली प्राण्यांचा धूमाकूळ वाढला असून शेतात उभ्या असलेल्या पिकांची नासधूस होत आहे त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला शेतकरी हतबल झाला आहे. जंगली प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.अल्प पावसामुळे शेतातील उत्पादन कमी होत आहे. बीजवाईसाठी कर्जाचा डोंगर वाढलेला असताना शेतात दादर, गहू, हरभरा,कांदा, केळी, डाळींबा आदी पिकांची पेरणी झालेली आहे. ऐन तोंडात येणारा घास रानटी प्राण्यांमुळे हिसकवला जात आहे. शेतात लोढळे, नीलगाय, जंगली प्राण्यांचा धुमाकूळ वाढल्याने शेतकरी त्रस्त आहे. फटाके फोडून त्यांना पिटाळण्यात येत आहे. मात्र त्यामुळे शेतकर्यांच्या डोळ्यातील झोप उडाली आहे. या प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त व्हावा व वन विभागाने याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व वनविभागाला निवेदन देण्यात येत आहे.शेतात रानटी प्राण्यांमुळे झालेली नासाडी व त्याबाबत नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.-------