राजस्थानमधील भिवडी येथून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्रियकर नसरुल्लाह आता अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारणार आहे. तो अंजूसोबत भारतात येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. आजतकशी संवाद साधताना नसरुल्लाह म्हणाला की, त्याचे अंजूवर मनापासून प्रेम आहे. टाईमपास नाही. तो तिच्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहे. व्हिसाची दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.
भिवडी येथे राहणारी अंजू 21 जुलै रोजी पाकिस्तानात पोहोचली होती. तिथे गेल्यानंतर अंजूने खैबर पख्तुनख्वा प्रांतात राहणाऱ्या नसरुल्लाहसोबत निकाह केला. नसरुल्लाह म्हणाला की, 2019 मध्ये अंजू एका मार्केटिंग कंपनीत काम करत होती. अंजूला फेसबुक कसे वापरायचे ते माहीत नव्हते. याच दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची अंजूशी भेट झाली.
फेसबुकवर बोलत असताना अंजू आणि नसरुल्लाह यांनी नंबर्सची देवाणघेवाण केली आणि व्हॉट्सएपवर चॅटिंग सुरू केलं. संवादाचे रुपांतर प्रेमात झालं आणि दोघेही रोज तासनतास बोलू लागले. नसरुल्लाह म्हणाली की, ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान दोघांनी भेटायचं ठरवलं. त्यांना एकदा भेटायचं होतं. अंजूने टुरिस्ट व्हिसा मिळवून पाकिस्तान गाठलं.
अंजूला पाकिस्तान फिरायला मिळावं म्हणून आजूबाजूच्या परिसरातील पर्यटनस्थळं निश्चित केली. एक चांगला प्लॅन तयार केला. अंजू पाकिस्तानात पोहोचल्यावर तिचे पूर्ण आदराने स्वागत करण्यात आले. पाकिस्तान सरकारकडून सुरक्षा मागितली होती, कारण सुरक्षा आवश्यक आहे. त्यानंतर तिच्यासाठी वेगळ्या घरात राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती, पण अंजू पाकिस्तानात आल्यानंतर घाईघाईत काही चुका झाल्या.
अंजूच्या दोन्ही मुलांना स्वीकारण्यास तयार असल्याचे नसरुल्लाहने सांगितले. अंजू आणि तिचं आधी बोलणं व्हायचं, त्याच वेळी दोघांनीही ठरवलं होतं की मुलांची काळजी घेऊ. अंजूचा पती अरविंद याबाबत विचारलं असता नसरुल्लाहने सांगितलं की, अंजूने 3 वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, मात्र अरविंदने त्यावर सही केली नव्हती. तो अंजूला मारहाण करून त्रास देत असे. अंजूने त्याला हे सांगितलं होतं.
नसरुल्लाह म्हणाला की, अंजू सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. मलाही भारतात यायचं आहे. अंजूसोबत भारतात येणार आहे. येथे तो सुरक्षा एजन्सी आणि मीडियाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे. त्याने कोणतीही चूक केली नाही. भिवडीमध्ये नोंदवलेल्या एफआयआरबाबत विचारले असता त्याने सांगितलं की, माझ्याविरुद्ध एफआयआर कशासाठी नोंदवण्यात आला आहे. कोणताही गुन्हा केलेला नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.