तामिळनाडूमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात भारताचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 12 लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले. यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
देशाने एक पराक्रमी पूत्र गमावला, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सर्व अधिकाऱ्यांचे निधन झाले हे वेदनादायी आहे. जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्या अकाली निधनाने मला धक्का बसला आहे. देशाने आपला एक शूर पुत्र गमावला आहे. मातृभूमीसाठी त्यांची चार दशके नि:स्वार्थ सेवा केली, जी शौर्य आणि पराक्रमाने चिन्हांकित होती. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना, असे ट्विट कोविंद यांनी केले आहे.
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे मी अत्यंत दु:खी आहे. या अपघातात आम्ही जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर कर्मचारी गमावले आहेत. त्यांनी अत्यंत तत्परतेने भारताची सेवा केली. या संकटाच्या परिस्थितीत मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे., असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले.
जनरल बिपीन रावत हे एक उत्कृष्ट सैनिक होते. एक सच्चा देशभक्त, ज्याने आपल्या सशस्त्र दलांचे आणि सुरक्षा यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात मोठे योगदान दिले. सामरिक बाबींवर त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टीकोन महत्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. ओम शांती, अशा शब्दांत मोदींनी रावत यांना श्रद्धांजली वाहिली.
संबंधीत बातम्या...
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन; हवाई दलाकडून घोषणा
एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हेलिकॉप्टर आदळत होते; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घडलेला थरार