त्रिशूलीः स्वातंत्र्याला 70हून अधिक वर्षं लोटली, तरीही देशातील या गावात अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. छत्तीसगडमधल्या त्रिशूली गावात अद्यापही वीज पोहोचलेली नाही. त्रिशूली गावात जवळपास 100 घरं आहेत. परंतु त्या गावात प्रशासनाला आजपर्यंत वीज पोहोचवता आलेली नाही. स्थानिकांनी आता कलेक्टर यांना पत्र लिहून वीज पुरवण्याची मागणी केली आहे.पत्रात गावकरी लिहितात, आजपर्यंत आमच्या गावात वीज पोहोचू शकलेली नाही. इथे जवळपास 100हून अधिक घरं आहेत. आमची मुलं वीज नसल्यानं सूर्यास्त झाल्यानंतर अभ्यास करत नाहीत. त्यानंतर बलरामपूरचे जिल्हाधिकारी संजीव कुमार झा म्हणाले, वीज अद्यापपर्यंत पोहोचलेली नसलेल्या गावांत सर्व्हे करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माजरा-टोला विद्युतीकरण योजनेंतर्गत त्रिशूली गावात वीज पोहोचवणार आहेत. तसेच त्रिशूलीसह इतर गावांमध्येही वीज पोहोचवली जाईल.
स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही 'या' गावात पोहोचली नाही वीज, जाणून घ्या पूर्ण कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:51 AM