शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याबाबत सरकारने बदलली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 11:09 PM

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन निकालामध्ये बदल करावा, अशी विनंती केंद्र सरकारने  सोमवारी सर्वोच्च न्यायालायाला केली आहे.

नवी दिल्ली - चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन निकालामध्ये बदल करावा, अशी विनंती केंद्र सरकारने  सोमवारी सर्वोच्च न्यायालायाला केली आहे. या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी  एका समितीचे गठण करण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच शपथपत्र सादर करून सांगितले.   2016 साली या संदर्भातील निकाल आल्यानंतर या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला होता. आता केंद्राने न्यायालयाला सांगितले की, समितीचा अहवाल मिळाल्यानंतर यासंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल. या मंत्रिगटाच्या समितीची नियुक्ती 5 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. दरम्यान, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या प्रकरणाची पुझील सुनावणी मंगळवारी करणार आहे. आता जोपर्यंत मंत्र्यांच्या समितीची निर्णय येत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात अंतरिम बदस करावा, अशी विनंतीही केंद्र सरकारने केली आहे.   

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतIndiaभारतGovernmentसरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय