शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

निती आयोग नेमणार खासगी सल्लागार

By admin | Published: March 17, 2017 12:56 AM

पूर्वीच्या नियोजन आयोगाचा नवा अवातर म्हणून मोदी सरकारने स्थापन केलेल्या निती आयोगाने सरकारी सेवेतील सचिवांहूनही जास्त पगार देऊन कंत्राटी पद्धतीने खासगी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव केला आहे.

नवी दिल्ली : पूर्वीच्या नियोजन आयोगाचा नवा अवातर म्हणून मोदी सरकारने स्थापन केलेल्या निती आयोगाने सरकारी सेवेतील सचिवांहूनही जास्त पगार देऊन कंत्राटी पद्धतीने खासगी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव केला आहे.या सल्लागारांची पदे तीन स्तरांवर असतील व त्यांना पगार व अन्य लाभ मिळून दरमहा २.८८ लाख ते ३. ६४ लाख रुपये एवढा गलेलठ्ठ पगार देण्याचा निती आयोगाचा प्रस्ताव आहे. कॅबिनेट सचिव हे सरकारी सेवेतील सर्वोच्च पद असून सातव्या वेतन आयोगानुसार या पदाचा मासिक पगार २.५० लाख रुपये एवढा आहे. सनदी सेवेत ३० वर्षे घालविल्यानंतर सरकारी अधिकारी या पदापर्यंत पोहोचत असतो.नव्या कल्पना, नवे विचार आणि बुद्धिमत्ता ही फक्त सरकारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी नाही. खासगी क्षेत्रांतही असे अनेक बुद्धिवंत उपलब्ध आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा, ज्ञानाचा व अनुभवाचा देशासाठी उपयोग करून घेण्यात काहीच गैर नाही, हा या मागचा विचार आहे. असे लोक सरकारी पठडीची नोकरी कायमची करण्यास तयार होणार नाहीत. त्यामुळे त्यांना ठराविक काळासाठी कंत्राटी पद्धतीने सल्लागार म्हणून नेमण्याचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले. खासगी क्षेत्रासोबत सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचाही प्रतिनियुक्तीवर नेमणुकीसाठी विचार केला जाऊ शकेल, असेही कळते.सूत्रांनुसार ठराविक विषयांसाठी असे सल्लागार नेमले जातील. वरिष्ठ सल्लागार, सल्लागार व उपसल्लागार अशा तीन स्तरांवर या नेमणुका करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या पदांसाठीचे पात्रता निकष व निवड-नेमणुकीचे नियमही निती आयोगाने तयार केले आहेत. या नियमांनुसार असे सल्लागार पाच वर्षांसाठी केली जाईल व त्यांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ दिली जाऊ शकेल. निती आयोगातील संबंधित विषयाच्या सदस्याच्या अध्यक्षतेखालील निवड समिती इच्छुकांमधून निवड करेल. निवड व नेमणुकीचा अंतिम निर्णय निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या सल्ल्याने घेतला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)इच्छुकांमधून निवडनिती आयोगातील संबंधित विषयाच्या सदस्याच्या अध्यक्षतेखालील निवड समिती इच्छुकांमधून निवड करेल. निवड व नेमणुकीचा अंतिम निर्णय निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या सल्ल्याने घेतला जाईल.