नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कमल 370 केंद्र सरकारने रद्द केल्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी नेते अब्दुल गनी लोन यांच्या मुलगा व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अकबर लोन आणि हसनैन मसूदी यांनी सुप्रीम कोर्टात कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अकबर लोने आणि हसन मसुदी यांनी दाखल केलेल्या याचिकेत जम्मू-काश्मीरचे दोन तुकड्यात केलेले विभाजन असंवैधानिक आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. तसेच, कलम 370 संदर्भातील निर्णयाला लवकरात लवकरत स्थगिती द्यावी, अशी विनंती या याचिकेत केली आहे.
गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात येणारे कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असता येथील अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे.
दरम्यान, कलम 370 रद्द करण्याआधी केंद्र सरकारने येथील परिस्थिती चिघळण्याची चिन्हे लक्षात काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती. तसेच, मोठ्याप्रमाणात जवान काश्मीर खोऱ्यात पाठविले होते. मात्र, आज जम्मू-काश्मीरमधील काही भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तसेच, सध्या काश्मीरमधील जनजीनन सुरुळीत असून एटीएम, दुकाने सुरु आहेत. तर, आजपासून शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत.