श्रीनगर : जम्मू काश्मिरात एका नव्या राजकीय घटनाक्रमाअंतर्गत नॅशनल कॉन्फरन्सने(एनसी) पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला(पीडीपी) पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे़ सरकार स्थापनेसाठी पीडीपीसमक्ष पाठिंब्याचा औपचारिक प्रस्ताव देणारे पत्र एनसीने राज्यपाल एन.एन. व्होरा यांना लिहिले आहे़ या घडामोडीनंतर राज्यात सत्ता स्थापनेवरून गत तीन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय पेच संपण्याची शक्यता बळावली आहे़तूर्तास पीडीपीकडून यासंदर्भात कुठलीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही़ आम्ही एनसीच्या या प्रस्तावावर चर्चा करू आणि नंतरच निर्णय घेऊ, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर यांनी स्पष्ट केले़ सरकार स्थापनेच्या मुद्यावर भाजपाशीही अप्रत्यक्ष पडद्यामागून बोलणी सुरू असल्याचेही अख्तर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले़एनसीचे कार्यकारी अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवरून या नव्या घटनाक्रमाची माहिती दिली़ आमच्या पक्षाने राज्यपालांना पत्र लिहून पीडिपीला पाठींबा देण्याच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार केला आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले़ विद्यमान विधानसभा आणि सरकार स्थापनेबाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी राज्यपालांनी पक्ष नेतृत्वाशी सल्लामसलत करावी, अशी विनंती एनसीने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)
नॅशनल कॉन्फरन्सने दिले पीडीपीला पाठिंब्याचे संकेत
By admin | Published: January 14, 2015 2:04 AM