राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
By admin | Published: December 27, 2014 11:38 PM
मणिपुरात ग्रेनेडचा स्फोट, चार जखमी
मणिपुरात ग्रेनेडचा स्फोट, चार जखमीइम्फाल-येथील उरीपोक भागात असलेल्या एका दुकानात ग्रेनेडचा स्फोट होऊन त्यात चार जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री संदिग्ध दहशतवाद्यांनी या दुकानात ग्रेनेड फेकला त्यात दुकानाच्या मालकासह चौघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. --------------------------------------------अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कारडेहराडून-१० वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची घटना बसंत विहार भागात घडली. ही मुलगी घराजवळच्या दुकानात सामान घेण्यास गेली असता या मुलाने तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या मुलाला बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. ----------------------------------------जैसलमेरच्या सीमेलगत सुरक्षा व्यवस्थेत वाढजैसलमेर-इंडियन मुजाहिदीनच्या नावाने राजस्थानच्या १६ मंत्र्यांना आलेल्या धमकीच्या ई-मेल्सनंतर जैसलमेर पोलिसांनी येथील सीमेलगतच्या भागातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. नव्या वर्षाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी येथे हजारो पर्यटक दाखल झाले असून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांची सविस्तर माहिती नोंदवावी, असे सांगण्यात आले आहे.-------------------------------------- साप चावल्याने पांढऱ्या वाघाचा मृत्यूइंदूर- येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात शनिवारी पहाटे कोब्रा या विषारी सापाने चावा घेतल्याने येथील पांढऱ्या वाघाचा मृत्यू झाला. सकाळी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्याला हा वाघ त्याच्या पिंजऱ्यात मृतावस्थेत आढळला. त्याच्या पिंजऱ्याजवळ एक कोब्रा सापही जखमी अवस्थेत आढळून आला. वाघाचे शवविच्छेदन केले असता त्याचा मृत्यू विषाने झाल्याचे निष्पन्न झाले.------------------------------------------ धर्मांतरावर कायदा बनविणे हे सरकारचे काम-सिंघलइंदूर- विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांनी, धर्मांतराच्या विरुद्ध कायदा बनविणे हे सरकारचे काम असल्याचे प्रतिपादन केले आहे. येथे विमानतळावर पत्राकारांशी बोलताना त्यांनी धर्मांतरावर बोलण्यास नकार दिला. धर्मांतराविरुद्ध कायदा करणे हे सरकारचे काम असून ते त्याने कसे करावे हे सरकारच ठरवू शकते, असे ते म्हणाले.---------------------------------- तीन कोटींच्या हेरॉईनसह दोन तस्कर अटकेतभदोही-उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात बाबूसराय येथे शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याजवळील तीन कोटी रुपये रकमेचे तीन किलो हेरॉईन हे मादक द्रव जप्त केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.---------------------------- मथुरेत शस्त्र निर्मितीच्या दोन डझन कारखान्यांवर धाडमथुरा-येथील जनपद येथे पोलिसांनी धाडी टाकून दोन डझनाहून अधिक शस्त्र निर्मितीच्या कारखान्यांना पकडले व मोठ्या प्रमाणावर शस्त्रेे जप्त केली. या शस्त्रांची खरेदी व विक्री करणाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे.-----------------------------------गोळीबारात एक ठार, सहा जखमीजालौन-किरकोळ वादातून झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन सहाजण जखमी झाल्याची घटना येथे घडली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुनील सक्सेना यांनी, येथील तकी मशीदजवळ काही लोकांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणात अचानक गोळीबार झाल्याने एक जण ठार झाला तर सहा जण जखमी झाल्याचे सांगितले.------------------------------------