शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

By admin | Published: January 15, 2015 10:32 PM

बलात्कार केल्याचा वकिलावर अशीलाचा आरोप

बलात्कार केल्याचा वकिलावर अशीलाचा आरोप
मथुरा- उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका जोडप्याने केलेल्या तक्रारीनुसार मथुरेतील एका वकिलाला त्याने त्याच्या अशीलावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली अहे. या महिलेने दिलीप सिसौदिया यांच्यावर त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी व अन्य कारवाई सुरू आहे.
--------------------------
जेवणातून विषबाधा, दोघांचा मृत्यू
नवादा- येथील चेरपुरा टोलात एक दाम्पत्यासह त्यांच्या दोन नातवंडांचा विषारी जेवण घेतल्याने मृत्यू झाला आहे. तसेच त्या कुटुंबातील दोन सदस्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. रात्रीच्या वेळी मकरसंक्रांतीनिमित्त बनविलेले चुडा दही व खिचडी खाल्यानंतर त्यांना उलट्या व मळमळ सुरू झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
------------------------------
नेताजींच्या समर्थकांची चेतना यात्रा
कटक- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे समर्थक शुक्रवारी त्यांच्या जन्मस्थानापासून इम्फाळपर्यंतची १५०० कि.मी.ची देशव्यापी चेतना यात्रा सुरू करीत आहेत. या यात्रेचा समारोप २३ जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीदिनी केला जाणार आहे. या यात्रेला नेताजींची नात जयंती बोस या हिरवी झेंडी दाखवतील.
----------------------------------
तामिळनाडूत पोंगलचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
चेन्नई- तामिळनाडूत पोंगल हा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरे कारण्यात आले. शहरात व गावांमध्ये रंगीत चित्रे चितारून रस्ते सजविण्यात आले होते. तर घरांना पानाफुलांनी सजविले होते. मंदिरांमध्ये विधीवत पूजा अर्चना करून नागरिकांनी हा सण साजरा केला.
-----------------------------------
बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी
बलरामपूर- उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील एका गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन मुलांसह तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने पथक तैनात केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
------------------------------
४० ग्रॅम हेरॉईन बाळगल्याबद्दल महिलेला नऊ महिन्यांची कैद
नवी दिल्ली- येथील एका स्थानिक न्यायालयाने एका महिलेला ४० ग्रॅम हेरॉईन बाळगल्याबद्दल नऊ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. महिलेला काही महिन्यांपूर्वी मादक द्रव्यांचा पुरवठा करताना पकडले होते.
------------------------------------
दारूवरील १७ वर्षे जुने निर्बंध हटविले
एजल-मिझोरमने गुरुवारी राज्यातील दारूवर गेल्या १७ वर्षांपासून असलेले निर्बंध हटविले आहेत. मात्र दारू पिऊन वाहन चालविणे व सार्वजनिक ठिकाणी भांडण करणे याकरिता कठोर शिक्षा दिली जाईल, असेही स्पष्ट केले आहे. या नव्या कायद्याने राज्यात प्रथमच दारू पिणे हे वैध ठरणार आहे.
------------------------------------
३५ लाखांची गावठी दारू जप्त
भिंड-अबकारी विभागाच्या एका पथकाने औद्योगिक क्षेत्रात असलेल्या गोल्ड वॉटर ब्रेवरीजवर धाड टाकून ३५ लाख रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी जिल्हा अबकारी अधिकार्‍यासह चार कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
------------------------------------
३७ हजार मुले कुपोषणमुक्त
रायपूर- छत्तीसगड सरकारने, नवाजतन योजनेनुसार राज्यातील ३७ हजारांहून अधिक बालकांना कुपोषणमुक्त केल्याचा दावा केला आहे. महिला व बालविकास मंत्री रमशिला साहू यांनी, या योजनेमुळे राज्यातील कुपोषणाच्या दरात घट होत असल्याची माहिती दिली आहे.
------------------------------------
माजी राज्यमंत्र्याविरुद्ध एफआयआर
सुलतानपूर-उत्तर प्रदेश विद्युत मंडळाच्या एका पथकाने तपास पूर्ण करून माजी राज्यमंत्री व अन्य तिघांविरुद्ध वीज चोरीकरिता एफआयआर दाखल केला आहे. माजी राज्यमंत्री मुईद अहमद यांच्या महाविद्यालयातविजेची चोरी केली जात असल्याचे या पथकाने म्हटले आहे. यावर अहमद यांनी, जुने कनेक्शन कापले गेले असून नव्या कनेक्शनसाठी आपण अर्ज दिल्याचे म्हटले आहे.