शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

राष्ट्रीय महत्वाचे-आतील पान

By admin | Published: September 01, 2015 9:38 PM

जम्मू-काश्मीर महामार्गावर टीएनटी स्फोटके जप्त

जम्मू-काश्मीर महामार्गावर टीएनटी स्फोटके जप्त
उधमपूर: जम्मू-काश्मिरात मंगळवारी उधमपूर जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर टीएनटी स्फोटके जप्त करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पथक पहाटे ५.३० वाजता महामार्ग स्वच्छ करण्याच्या कामात व्यस्त असताना खेरी भागात रस्त्याच्या काठावर टीएनटी पेरून ठेवल्याचे आढळले. दुसऱ्या एका घटनेत जम्मूच्या नरवाल क्षेत्रात झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला ४०० राऊंड दारुगोळा जप्त केला.

राहुल गांधींची ओडिशात शेतकरी बचाव पदयात्रा
भुवनेश्वर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या १० सप्टेंबरला दोन दिवसांसाठी ओडिशाच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते बडगड जिल्ह्यात शेतकरी बचाव पदयात्रेचे नेतृत्व करतील. केंद्र व राज्यातील बिजू जनता दल सरकारला अनेक आघाड्यांवर आलेले अपयश जनतेपुढे आणण्याकरिता ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रसाद हरिचंदन यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.


मानवरहित रेल्वे क्रासिंगवरील अपघातात चार ठार
मैनापुरी: जिल्ह्यातील एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेेगाडीने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारजण ठार तर अन्य सहा जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोगाव क्षेत्रात रजवाना मार्गावर प्रवासींनी गच्च भरलेली एक कार मानवरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडत असताना हा अपघात झाला.


श्रीलंकेच्या नौदलाकडून १६ मासेमारांना अटक
रामेश्वरम: श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय जलसीमा रेषेचे उल्लंघन केल्याच्या आरोपात पुडुकोट्टई जिल्ह्याच्या जगधापट्टिनम येथून १६ मासेमारांना अटक केली. हे मासेमार कोडियाकराई किनाऱ्यावर भारतीय जलक्षेत्रात मासेमारी करीत होते,अशी माहिती मासेमार संघाचे अध्यक्ष एस. एमिरेट यांनी दिली.

कच्चा कैद्याला बाजारात नेणारे पोलीस बडतर्फ
नवी दिल्ली: एका कच्चा कैद्याला आग्रा न्यायालयात सुनावणीनंतर खरेदीसाठी बाजारात घेऊन जाणाऱ्या एका उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे सर्व दिल्ली सशस्त्र पोलिसांच्या तिसऱ्या तुकडीत तैनात होते.

२० हजारासाठी सावत्र मुलीला विकले
एटा: उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील नागला बुर्ज गावात राहणाऱ्या विरमादेवी नामक महिलेने तिच्या १७ वर्षीय सावत्र मुलीला २० हजार रुपयात मध्य प्रदेशातील एका ५२ वर्षीय इसमास विकल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने यासंदर्भात पोलिसात तक्रार केली असून तपास सुरू आहे.

आसाममधील भूस्खलनात मायलेकीचा मृत्यू
रांगिया: आसामच्या कामरुप (ग्रामीण) जिल्ह्यातील अमीनगाव भागात मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने मायलेकीचा मृत्यू झाला. वृत्त कळताच चंगसारी छावणीतील एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन दोघींचे मृतदेह बाहेर काढले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होत आहे.

बेकायदेशीर शस्त्र निर्मिती कारखान्याचा भंडाफोड
एटा: पोलिसांनी परोली गावात धाड घालून बेकायदेशीर शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या कारखान्यातून असंख्य देशीकट्ट्यांसह शस्त्रास्त्र निर्मितीची उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलाशचंद्र यांनी दिली.

जम्मू-काश्मिरात वकिलांच्या संपाने न्यायालयाचे कामकाज ठप्प
श्रीनगर: हायकोर्ट बार असोसिएशनने संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात संप पुकारल्यामुळे मंगळवारी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांमधील कामकाज ठप्प होते. मोहम्मद अब्दुल्ला पंडित यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी वकिलांनी केली आहे.

मथुरेत दोन शस्त्र तस्करांना अटक
मथुरा: उत्तर प्रदेशात शस्त्रतस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मथुरा, हाथरस आणि अलिगडमधील विविध दुकानांमध्ये चोरीच्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना अटक करून त्यांच्याजवळील एक रिव्हॉल्वर,१२ बंदुका आणि २४ काडतूस जप्त केले.

मदरशांवर तिरंगा फडकविण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
अलाहाबाद: देशाचा स्वातंत्र्य दिन आणि गणराज्य दिनी राज्यातील मदरशांमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्यात येतील याकडे लक्ष देण्याचे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले. यासंदर्भात आवश्यक ते आदेश काढण्याची सूचनाही मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. यशवंत वर्मा यांच्या पीठाने दिले.