राष्ट्रीय महत्वाचे- आतील पान
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची कैद
बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षांची कैदअनंतपूर (आंध्र प्रदेश)- स्थानिक न्यायालयाने आठ वर्षीय बालिकेवर बलात्कारप्रकरणी एका युवकाला १० वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली आहे. अनंतपूर अतिजलद न्यायालयाच्या न्यायाधीश बी. सुनीता यांनी २० वर्षीय सिद्धार्थ रेड्डीला मंगळवारी दोषी ठरवून त्याला २२,००० रुपये दंडही सुनावला.रेल्वेत घाण करणाऱ्या प्रवाशांकडून ४३,२०० रुपये दंडवसुलीभोपाळ- भोपाळ विभागातील रेल्वेस्थानके आणि गाड्यांमध्ये घाण करणाऱ्यांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात घाण करणाऱ्या ४३२ प्रवाशांना पकडण्यात येऊन त्यांच्याकडून ४३,२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाने बुधवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.काश्मिरात बीएसएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्नजम्मू- जम्मू- काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने त्याच्या सरकारी रायफलने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी शिपायाचे नाव वीरसिंग असे असून तो मूळ राजस्थानचा रहिवासी आहे. नियंत्रण रेषेजवळील आघाडीच्या चौकीवर बुधवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.कारागृहातून तीन मोबाईल, दोन सीमकार्ड जप्तमधेपुरा- बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील एका कारागृहात बुधवारी घालण्यात आलेल्या धाडीत विविध वॉर्डांमधून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, दोन सिमकार्ड, एक मोबाईल चार्जर आणि इतर बेकायदेशीर साहित्य जप्त केले. पोलीस अधीक्षक आशिष भारती यांनी यासंदर्भात माहिती देताना गुप्त सूचनेच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.कोच्ची विमानतळावर ५५ लाखांच्या सोन्याच्या कांब्या जप्तकोच्ची- सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे जेद्दाह येथून आलेल्या एका प्रवाशाकडून सोन्याच्या सहा कांब्या जप्त केल्या असून त्यांची किंमत ५५ लाख रुपये आहे. हा प्रवाशी त्रिसूर जिल्ह्यातील असून तो कतार एअरवेजच्या विमानाने येथे आला होता.विद्यार्थिनीवर बलात्कारदोन तरुणांना अटकरायपूर- येथील एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी दोन युवकांना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील सुपेला पोलीस स्टेशनअंतर्गत कोहका गावात ही घटना घडली.तेलंगणा व आंध्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूकनवी दिल्ली- तेलंगणा आणि आंध्र विधान परिषदेच्या प्रत्येकी दोन जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने बुधवारी येथे केली. या निवडणुकीसाठीची अधिसूचना १९ फेब्रुवारीला जारी केली जाईल.काश्मिरातील हिमस्खलनात एक ठारश्रीनगर- उत्तर काश्मीरचे प्रसिद्ध स्की रिसोर्ट गुलमर्गमध्ये बुधवारी दुपारी झालेल्या हिमस्खलनात एका २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मृताचे नाव बशीर अहमद बख्शी असे असून तो तंगमार्ग येथील रहिवासी आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.