शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्दे ठरताहेत अधिक प्रभावी; कलम ३७०, यूसीसी विरुद्ध बेरोजगारी, महागाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 6:25 AM

उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत.

संतोष सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : उत्तराखंडमध्ये यंदा स्थानिक मुद्यांपेक्षा राष्ट्रीय राजकारणातील मुद्देच अधिक प्रभावी ठरत आहेत. उत्तराखंडच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकींचा आतापर्यंतचा कल पाहता राज्याच्या स्थापनेपासून भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या परंतु राजकीयदृष्ट्या तेवढ्याच महत्वाच्या असलेल्या पहाडी मतांना अत्यंत महत्व आहे. त्यामुळे मुख्यत्वे भाजपने या ठिकाणी आपल्या प्रचाराचा ’फोकस’ कायम ठेवला आहे.

भाजपने गेल्या दोन्ही निवडणुकींमध्ये उत्तराखंडमध्ये क्लीन स्विप मिळवला आहे. इतर राज्यांप्रमाणेच उत्तराखंडमध्येही भाजपने यूनिफॉर्म सिव्हील कोड (यूसीसी), कलम ३७०, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर या मुद्द्यांवर निवडणुकीचा प्रचार राबवला. देशात यूसीसी लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरले होते. त्यामुळे या जोरावरच भाजपचा प्रचार सुरु आहे. उत्तराखंड राज्य सैनिकीदृष्ट्या अत्यंत संवेदनशिल आहे. त्यामुळे काँग्रेसने अग्निवीर सारख्या मुद्द्यांवरुन भाजपला घेरलं आहे. दुसरीकडे बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांप्रमाणेच निवडणूक रोख्यांचा विषयही काँग्रेसने लावून धरला आहे.

हरिद्वारकडे विशेष लक्ष भाजपने हरिद्वारच्या जागेवर विद्यमान खासदार रमेश पोखरियाल निशंक यांची उमेदवारी कापून माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पुत्र विरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवरील लढतीकडे विशेष लक्ष आहे.

प्रियांका गांधी एकट्या लढवताहेत प्रचाराचा किल्लाउत्तराखंडमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासारखी बलाढ्य प्रचार साखळी असताना दुरीकडे काँग्रेसने मात्र या ठिकाणी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावरच प्रचाराची धुरा ठेवली होती. या ठिकाणी प्रियंका गांधींकडून सभा, रॅलीव्दारे मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Article 370कलम 370