नवी दिल्ली - दैनंदिन जीवनात संवाद साधण्यासाठी प्रामुख्याने मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेचा वापर केला जातो. संस्कृत भाषा ही अध्ययनासाठी असते. संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मात्र आता पाच गावांतील लोक संस्कृतमधून बोलायला शिकणार आहेत. राष्ट्रीय संस्कृत संस्था देशातील पाच गावं संस्कृत शिकवण्यासाठी दत्तक घेणार आहे. संस्कृत भाषा ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्रिपुरातील जुबार्ता, हिमाचल प्रदेशमधील मसोत, कर्नाटकमधील चिट्टेबळी, केरळमधील अदात आणि मध्य प्रदेशमधील बराई ही पाच गावे दत्तक घेण्यात आली आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय संस्कृत संस्थेने हा निर्णय घेतला आहे. गावात गावात राहणाऱ्या लोकांना संस्कृतमध्ये संवाद साधता यावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा तसेच संस्कृत ही बोलीभाषा होण्यास चालना मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्था (आरकेएस), लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (एसएलबीएसआरएसवी), तसेच राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (आरएसवी) या तीन केंद्रीय संस्था देशात संस्कृतच्या प्रसाराचे काम करतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थांना संस्कृत शिकवण्यासाठी प्रत्येकी किमान दोन गावे दत्तक घेण्याचे निर्देश दिले होते.
दत्तक घेण्यात आलेल्या पाच गावातील लोकांना संस्कृत भाषा शिकवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी संस्कृत प्रसारासाठी काम करणाऱ्या तीन संस्थांनी प्रत्येकी किमान दोन गावे दत्तक घ्यावीत, असे निर्देश दिले होते. त्यानंतर आता राष्ट्रीय संस्कृत संस्था जुबार्ता (त्रिपुरा), मसोत (हिमाचल प्रदेश), चिट्टेबळी (कर्नाटक), अदात (केरळ) आणि बराई (मध्य प्रदेश) ही पाच गावं दत्तक घेणार आहे.
''या'' ठिकाणी शोधण्यात आले 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 कोटी 10 लाख अर्थपुण्यातील डेक्कन कॉलेजमधील संस्कृत व कोशशास्त्र विभागामध्ये 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 कोटी 10 लाख अर्थ शोधण्यात आले आहेत. हजारो संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन तज्ञांनी संस्कृत शब्दांचे अर्थ व त्यांचे संदर्भ शोधून काढले आहेत. या संस्कृत शब्दांचा विश्वकोष सुद्दा तयार करण्यात आला असून आत्तापर्यंत याचे 34 खंड प्रकाशित झाले आहेत. पुण्यातील येरवडा भागात डेक्कन कॉलेज हे अभिमत विद्यापीठ आहे. यामध्ये पुरातत्व, भाषशास्त्र आणि संस्कृत हे प्रमुख विभाग आहेत. या कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबरच संशोधन देखील चालते. याच कॉलेजच्या संस्कृत विभागामध्ये विविध भाषा पंडितांनी 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 कोटी 10 लाख अर्थ आणि त्यांचे संदर्भ शोधले आहेत. या ठिकाणी संस्कृत भाषेचा विश्वकोष तयार करण्यात येत असून या विश्वकोषाचे आत्तापर्यंत 34 खंड प्रकाशित झाले आहेत.