पालीगंज : राष्ट्रीय सुरक्षा हाही निवडणुकांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघात पालिगंज येथे प्रचारसभेत ते बोलत होते.त्यांनी सांगितले की, दहशतवादाला आक्रमक शैलीतच उत्तर देणे योग्य असून तेच धोरण माझ्या सरकारने अंगिकारले आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा निवडणुकांतील मुद्दा होऊ शकत नाही, असे विरोधकांच्या महाभेसळ आघाडीचे मत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत निरपराध माणसे मरण पावत असताना राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसूनच मारले पाहिजे आणि हवाई दलाने त्यामुळेच पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. ते म्हणाले की, काहीजण जातीपातीचे राजकारण करून सत्ता मिळविण्याचा खटाटोप करत आहेत. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे आणताना हे नेते स्वत:च्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र डावलत आहेत.काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४मध्ये दिल्लीमध्ये शीखविरोधी दंगलींबाबत ‘झाले ते झाले' असे उद्गार काढले होते. त्याबद्दलमोदी म्हणाले की, पित्रोदांच्या उद्गारांतून विरोधकांचा उद्धटपणा व क्षमा न मागण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन घडते. (वृत्तसंस्था)
विकासाची गंगा आणूनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकांतपुन्हा भाजपच जिंकणार आहे. पंतप्रधानपदाच्या पुढच्या कारकीर्दीत मी बिहारमध्ये नव्याने विकासाची गंगा आणेन. लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातही भाजप व त्याच्या मित्रपक्षांनाच भरघोस मतदान करण्याचेआवाहन त्यांनी जनतेला केले.