ऑनलाइन लोकमतचिरांग, दि. 15 - एकेकाळी राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या आसाममधल्या बुली बसुमतारी हिला रस्त्यावर संत्री विकावी लागत आहेत. राष्ट्रीय सब-ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेत बुलीनं आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक प्राप्त केलं आहे. मात्र राष्ट्रीय तिरंदाजी सुवर्ण पदक विजेत्या बुलीवर हलाखीची परिस्थिती ओढावली आहे. आसाम सरकारनं तिला पोलिसांच्या सेवेत सामावून घेण्याचं आश्वासन देऊन तिला पोलीसची नोकरी देण्यात आली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मी रस्त्यावर संत्री विकते आहे. मी अनेक पदकं जिंकली आहेत. तसेच मी आसाम पोलिसांत सामावून घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांनी मला नोकरी दिली नाही. 2010मध्ये आजारामुळे बसुमतारी हिला तिरंदाजीचा खेळ सोडावा लागला. त्यानंतर ती कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी संत्री विकू लागली. ज्यावेळी बसुमतारी हिला खरी आर्थिक मदत हवी होती, त्याचवेळी आसाम सरकारनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. बसुमतारी हिच्याबाबत आसामच्या क्रीडा मंत्र्यांना समजल्यानंतर तेही खडबडून जागे झाले आहेत. ते म्हणाले, बुली बसुमतारी हिला पुढच्या आठवड्यात तिरंदाजी प्रशिक्षण म्हणून नियुक्ती करण्यात येईल. ती पंजाबमध्ये अल्पकालीन प्रशिक्षण देईल.
राष्ट्रीय तिरंदाजाला उपजीविकेसाठी विकावी लागतायत संत्री
By admin | Published: February 15, 2017 6:20 PM