नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनात दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं. दहशतवादाला पोसणाऱ्या, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा विरोध व्हायला हवा, असं मोदी म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बदलांची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.'जागतिक कारभाराच्या कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागली आहेत. बदलत्या काळासोबत यामध्ये बदल न झाल्यानं प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. कारण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची रचना ७५ वर्षे जुनी आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. परिषदेची रचना ७५ वर्षांपूर्वीच्या मानसिकता आणि वास्तविकतेवर बेतलेली आहे. यामध्ये बदल होण्याची नितांत गरज असल्याचं भारताला वाटतं. यामध्ये ब्रिक्स संघटनेतील देश सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे,' असं मोदी म्हणाले.
दहशतवादाला थारा देणाऱ्या देशांचा विरोध व्हावा; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर वार
By कुणाल गवाणकर | Published: November 17, 2020 6:06 PM