राफेलप्रकरणी काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, मध्य प्रदेशात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 04:45 AM2018-08-05T04:45:09+5:302018-08-05T04:45:27+5:30
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असून, त्या वेळीच या आंदोलनाची सुरुवात होईल. मध्य प्रदेशाात सुरू होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात येत आहे. मित्रपक्षांनीही राफेल घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करून, पंतप्रधान मोदी यांनी कशाप्रकारे कमी किमतीची विमाने जास्त किमतीत खरेदी केली आहेत, हे सांगावे, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात आसाममधील राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरचा मुद्दा प्रमुख होता. राजीव गांधी यांनी केलेल्या आसाम करारानुसार अवैधरीत्या भारतात राहणाºया घुसखोरांना बाहेर काढण्यात यावे, मात्र खºया नागरिकांना धोका पोहोचू नये याची काळजी घ्यायला हवी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
बैठकीत काँग्रेस सदस्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधताना आरोप केला की, धर्म, जाती आणि भाषेच्या आधारावर भाजपा एनआरसीच्या आडून विभाजनाचे राजकारण करत आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी हा डाव हाणून पाडावा. देशाची बिघडती अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि शेतीपुढील संकटे यांचाही अजेंड्यात समावेश करण्यात आला.
बैठकीत सोनिया गांधी अस्वस्थतेमुळे सहभागी नव्हत्या, मात्र माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए. के. अँटोनी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अंबिका सोनी, आनंद शर्मा, ओमन चांडी, मुकुल वासनिक, अहमद पटेल, हरीश रावत, कुमारी शैलजा, मोतीलाल व्होरा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
>घोटाळ्यांचाही मुद्दा
अशोक गेहलोत म्हणाले की, मेहुल चोक्सीला अँटिग्वाचे नागरिकत्व देण्यात मोदी सरकारने मदत केली, सरकारच्या इशाºयावरून
तो पीएनबीची फसवणूक करून देशाबाहेर गेला. त्याला सरकारच्या मदतीने देशाबाहेर नेण्यात आले, हे जनतेच्या मनावर बिंबवण्यात येणार आहे.